कर्नाटक : बिबट्याने 21 वर्षीय विद्यार्थीनिला ठार मारले...

कर्नाटक : बिबट्याने 21 वर्षीय विद्यार्थीनिला ठार मारले...

belgavkar.com | belgaum | belgavkar

बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना सरकारकडून प्रत्येकी 15 लाखांची मदत

राजधानीमध्ये 4 बिबट्या आढळले;
अधिकारी हाय अलर्टवर

कर्नाटक : राजधानी बेंगळूरु परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. तसेच बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना सरकारकडून प्रत्येकी 15 लाखांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, 'तीन-चार दिवसांपासून बेंगळूरुच्या हद्दीसह आसपासच्या परिसरात बिबट्याचे दर्शन होत असल्याने साहजिकच लोक चिंतेत आहेत. त्याला तातडीने पकडण्यासाठी विशेष पथक तयार करण्याच्या सूचना संबंधितांना दिली आहे.
यापूर्वी वनक्षेत्रात बिबट्यांचा वावर होता. आता ते बेंगळूरुजवळ दिसू लागले आहेत. त्याला लवकरात लवकर पकडून जंगलात सोडण्याची सूचना केली आहे. बेंगळूरु आणि म्हैसूर झोनमध्ये हत्ती कॉरिडॉरच्या आसपासही बिबट्या आहेत. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि बिबट्यांना पकडण्यासाठी पथक ऑपरेशन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. बेंगळूरुच्या आजूबाजूला जे घडत आहे, ते वनविभागाने गांभीर्याने घेतले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू असून त्यासाठी सापळाही रचण्यात आला आहे. त्याला जिवंत पकडून जंगलात सोडण्याच्या सूचना आपण विभागाला दिल्याचे त्यांनी सांगितले.
म्हैसूर सर्कलच्या वनसंरक्षक मालती प्रिया यांनी म्हैसूर जिल्ह्यातील टी नरसीपुरा तालुक्यात एका 21 वर्षीय विद्यार्थीनिला ठार मारणाऱ्या बिबट्याला दिसताक्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश दिले. मेघना असे मृताचे नाव असून ती टी नरसीपुरा येथील शासकीय प्रथम श्रेणी महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती. मेघनाचे घर उसाच्या शेतात आहे. सायंकाळी 6 ते 7 वाजेच्या दरम्यान ती तिच्या घराशेजारील शेतातील शेडमध्ये गेली असता ही घटना घडली. बिबट्याने तिला 200 मीटरपर्यंत ओढून नेले आणि गंभीर दुखापत झाली. तिचा आरडाओरडा ऐकून कुटुंबीय आणि स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत तिला वाचवण्यात यश मिळविले. तिला त्वरीत नरसीपुरा सार्वजनिक रुग्णालयात नेले असता तिचा मृत्यू झाला.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

कर्नाटक : बिबट्याने 21 वर्षीय विद्यार्थीनिला ठार मारले...
बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना सरकारकडून प्रत्येकी 15 लाखांची मदत

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm