बेळगाव : बेळगावचा दुचाकीस्वार अपघातात ठार

बेळगाव : बेळगावचा दुचाकीस्वार अपघातात ठार

belgavkar.com | belgaum | belgavkar

चिकोडी-एकसंबा मार्गावर नणदी क्रॉस येथे अपघात

बेळगाव : एकसंबाहून बेळगावकडे जात असलेल्या दुचाकीस्वाराचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने तो दुचाकीसह पाणी साचलेल्या खड्ड्यात पडला. यामध्ये तो जागीच ठार झाल्याची घटना रविवारी रात्री चिकोडी-एकसंबा मार्गावर नणदी क्रॉस येथे घडली. नितीन दीपक केसरकर (वय 35, रा. गणेशपूर, बेळगाव) असे मृताचे नाव आहे.
नितीन हा एकसंबा येथे आपल्या पाहुण्यांकडे आला होता. रात्री उशिराने तो बेळगावला आपल्या दुचाकीवरून जात असताना नणदी क्रॉसजवळ रस्त्यावर असलेल्या वळणावर त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने तो दुचाकीसह जाऊन खड्ड्यात पडला. यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी सकाळी ही घटना नागरिकांच्या लक्षात आली. नागरिकांनी कळविल्यानंतर सदलगा पोलिसांनी येऊन पंचनामा केला.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : बेळगावचा दुचाकीस्वार अपघातात ठार
चिकोडी-एकसंबा मार्गावर नणदी क्रॉस येथे अपघात

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm