बेळगाव : खैरवाड येथे भरदुपारी घरफोडी

बेळगाव : खैरवाड येथे भरदुपारी घरफोडी

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : खानापूर तालुक्यातील नंदगड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खैरवाड येथे भरदुपारी नागाप्पा अप्पाण्णा भुजगुरव यांच्या घरी धाडसी चोरी करून चोरट्यांनी तीन तोळे सोने व रोख 75000 व दहा तोळे चांदी असा ऐवज लंपास केला आहे. खैरवाड येथील नागाप्पा भुजगुरव हे शेतात भात मळणी करण्यासाठी सोमवारी सकाळी आठ वाजता गेले होते. त्यानंतर सकाळी अकरा वाजता त्यांच्या पत्नी चंद्रभागा या जेवण घेऊन गेल्या होत्या. घर बंद असलेले पाहून चोरट्यांनी घराचा मागील दरवाजा तोडून आत प्रवेश केला.

घरातील तिजोरी तोडून त्यात ठेवलेले ₹ 75000 आणि तीन तोळे सोने, दहा तोळे चांदी घेऊन चोरट्यांनी पलायन केले आहे. दुपारी दोन वाजता चंद्रभागा या घरी परत आल्यावर समोरचा दरवाजा आतून बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी घरच्या मागील बाजूला जाऊन पाहिले असता मागचा दरवाजा तोडलेला होता. तातडीने त्यांनी शेजारील लोकांना बोलावून घरात प्रवेश केला तर घरातील तिजोरी तोडून साहित्य व कपडे अस्ताव्यस्त पसरलेले नजरेस पडले. शेतात मळणी करत असलेल्या आपल्या पतीला यांची त्यांनी कल्पना दिली.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : खैरवाड येथे भरदुपारी घरफोडी

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm