चोरांचा जीवाशी खेळ....! चालत्या ट्रेनमधून केली तेलाची चोरी; Viral व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

चोरांचा जीवाशी खेळ....!
चालत्या ट्रेनमधून केली तेलाची चोरी;
Viral व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

belgavkar.com | belgaum | belgavkar

जीवाशी खेळत चोरांची चालत्या ट्रेनमधून तेल चोरी

बिहारमध्ये होणाऱ्या चोरीच्या बातम्या तुम्ही बऱ्याचवेळा ऐकल्या असतील. काही काळापूर्वी मोबाईल टॉवर, रेल्वे इंजिन आणि पुल चोरीची प्रकरणेही तुम्हाला माहिती असेल. सध्या बिहारमधून आणखी एक चोरीचे प्रकरण समोर आले आहे जे पाहून तुम्ही थक्क व्हाल. चोर अशा पद्धतीने चोरी करू शकतात याची तुम्ही याआधी कल्पनाही केली नसेल. सोशल मीडियावर एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये बिहारमधील चोर चालत्या मालगाडीतून तेल चोरताना पकडले गेले आहेत. मालगाडीतून तेल चोरीचे प्रकरण आले समोर नुकत्याच एका व्हिडिओमध्ये, बिहारमधील चोरांनी पाटणाच्या प्रशासकीय उपविभाग बिहटा येथून जाणाऱ्या तेल टँकर ट्रेनला लक्ष्य केले.
ट्विटर युजरने हा व्हिडिओ पोस्ट केला असून त्याने व्हिडिओसोबत लिहिले की, “बिहारमध्ये चालत्या मालगाडीतून तेल चोरी करण्यास सुरुवात, हा व्हिडिओ बिहारच्या पाटणा जिल्ह्यातील बिहता नगरचा असून, चालत्या मालगाडीतून चोरी करतानाचे हे दृश्य आहे”. तेल चोरी करताना कोणीतरी मोबाईल कॅमेऱ्यात व्हिडिओ रेकॉर्ड करून नंतर सोशल मीडियावर टाकल्याचे दिसते. स्थानिकांनी तेलाचे टँकर घेऊन जाणाऱ्या मालगाडीवर हल्ला केला आणि नंतर त्यांच्या बादल्यांमध्ये तेल भरण्यासाठी धावताना दिसले.

व्हिडीओ लक्ष देऊन पाहिल्यास दिसून येईल की, बादलीत तेल भरत असताना एक रेल्वे ब्रिजही आहे, जिथे चोरटे जीवाची पर्वा न करता धावत आहेत. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) च्या तेल डेपोकडे जाणारी मालगाडी आपल्या गंतव्यस्थानी पोहोचण्यापूर्वीच चोरांनी तेल चोरण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत या कृत्याविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. हा चोरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून लोक यावर वेगवेगळ्या कंमेंट करताना दिसत आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

चोरांचा जीवाशी खेळ....! चालत्या ट्रेनमधून केली तेलाची चोरी; Viral व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का
जीवाशी खेळत चोरांची चालत्या ट्रेनमधून तेल चोरी

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm