ऐकावं ते नवलचं...! 1 कोटीचं पॅकेज तरीही ऑफिसमध्ये नाही काम, कर्मचाऱ्याने चक्क बॉसविरोधात कोर्टात दिली तक्रार

ऐकावं ते नवलचं...!
1 कोटीचं पॅकेज तरीही ऑफिसमध्ये नाही काम, कर्मचाऱ्याने चक्क बॉसविरोधात कोर्टात दिली तक्रार

belgavkar.com | belgaum | belgavkar

ऑफिसमध्ये प्रमाणापेक्षा जास्त काम करायला लावतात म्हणून एखाद्या कर्मचाऱ्याने आपल्या बॉसविरोधात तक्रार केल्याची तुम्ही अनेक उदाहरणं पाहिली असतील. पण ऑफिसमध्ये कमी काम करायला सांगितलं म्हणून कर्मचाऱ्याने बॉसविरोधात तक्रार केल्याचं सांगितलं तर तुम्हाला कदाचित ते पटणार नाही, पण हे खरं आहे. आयरिश रेल्वे विभागात काम करणाऱ्या अ‍ॅलिस्टर मिल्स नावाच्या कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसविरोधात कोर्टात केस दाखल केली. अ‍ॅलिस्टरने ही तक्रार करताना आपणाला ऑफिसच्या वेळेत फार कमी काम दिले जातं असल्याचं त्याने सांगितलं आहे. पण त्याला कमी काम का दिलं जातं? याचं कारण ऐकून तुम्हीसुद्धा हैराण व्हाल.
आयरिश रेल्वे विभागातील फायनान्स मॅनेजर म्हणून काम पाहणाऱ्या अ‍ॅलिस्टर मिल्सने तक्रार दाखल करताना सांगितलं आहे की, मला शिक्षा देण्याच्या उद्देशाने कमी काम दिले जाते. कारण मी रेल्वे खात्यांशी संबंधित काही प्रकरणांवर प्रश्न उपस्थित केले होते. ते प्रकरण आयर्लंडमधील डब्लिनचे आहे. तसंच त्याने कोर्टात सांगितलं की, 2014 मध्ये रेल्वे ऑपरेटरशी संबंधित काही खात्यांच्या प्रकरणांवर मी प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे मला त्रास व्हावा या उद्देशाने रेल्वे विभागाकडून जाणीवपुर्वक माझ्या कामामध्ये कपात करण्यात आली आहे. ‘द मिरर’ने दिलेल्या माहितीनुसार, अ‍ॅलिस्टर म्हणतो की, त्याला काम नसल्यामुळे त्याचा सर्वाधिक वेळ रहा पेपर वाचण्यात, फिरण्यात आणि सँडविच खाण्यात घालवावा लागतो. त्यामुळे त्याला नोकरीचा कंटाळा येतो. तर अ‍ॅलिस्टरचे वार्षिक पॅकेज सुमारे एक कोटी रुपये असून त्याला महिन्याला 8 लाखांहून जास्ती पगार मिळतो.
अ‍ॅलिस्टर ‘वर्कप्लेस रिलेशन कमिशन’समोर आरोप केला आहे की, आयरिश रेल्वेच्या विरोधात बोलल्याबद्दल मला जाणीवपुर्वक शिक्षा दिली जात आहे. शिवाय मला अशी शिक्षा दिली जात आहे की ज्यामध्ये काम खूपच कमी करावं लागतं. त्यामुळे कार्यालयीन वेळी काम नसल्यामुळे आपणाला कंटाळा येत असल्याचंही त्यांने सांगितलं आहे.
मी एकटा पडलोय
“सध्या ऑफिसमध्ये मी एकटा पडलो असून, मला आठवड्यातून दोन दिवस घरी राहण्यास सांगितलं जातं. ऑफिसला गेलो तरी कामाशी संबंधित कसलेही मेल, मेसेज येत नाहीत. माझे सर्व सहकारी माझ्यापासून लांब राहतात शिवाय मला ऑफिस संदर्भातील बैठकांमध्येही बोलवलं नाहीत. त्यामुळे मला केवळ काम न करण्याचा पगार दिला जात आहे” असं अ‍ॅलिस्टरने म्हटलं आहे. दरम्यान, या प्रकरणाची सुनावणी कोर्टाने पुढे ढकलली असून ती फेब्रुवारीपर्यंत होणं अपेक्षित आहे, कारण अ‍ॅलिस्टरच्या बॉसने कोर्टात नवीन साक्षीदार हजर करणार असल्याचं सांगितलं आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

ऐकावं ते नवलचं...! 1 कोटीचं पॅकेज तरीही ऑफिसमध्ये नाही काम, कर्मचाऱ्याने चक्क बॉसविरोधात कोर्टात दिली तक्रार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm