वर्षभरापासून बंद हाेते घर, दार उघडताच घरमालकाच्या पायाखालची जमीनच सरकली

वर्षभरापासून बंद हाेते घर, दार उघडताच घरमालकाच्या पायाखालची जमीनच सरकली

belgavkar.com | belgaum | belgavkar

आफताब अमीन पूनावालने आपली लिव्ह इन पार्टनर श्रद्धाची हत्या करून तिचे 35 तुकडे केले. या घटनेमुळे अवघे समाजमन सुन्न झाले. त्यानंतर अशा प्रकारच्या अनेक घटना समोर येत आहे. आता अशीच एक धक्कादायक घटना आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये येथे घडली आहे. विशाखापट्टणम येथे एका बंद असेल्या घरात ठेवलेल्या ड्रममध्ये महिलेच्या शरीराचे अनेक तुकडे सापडले. वर्षभराहून अधिक काळ हा मृतदेह तेथे पडून असल्याचा पोलिसांना संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. भाडेकरू घरचे भाडे न देत असल्याने घर मालकाने घराचा दरवाजा तोडला. तेव्हा घरातील एका ड्रममध्ये महिलेच्या मृतदेहाचे अनेक तुकडे आढळून आले. विशाखापट्टणमच्या मदुरवदामध्ये हा प्रकार उघडकीस आला.
भाडेकरू काही महिन्यांपूर्वीच घर सोडून गेला. घरमालकाच्या म्हणण्यानुसार, जून 2021 मध्ये भाडेकरू पत्नीच्या गर्भधारणेचे कारण देत घराला कुलूप लावून कुठेतरी गेला होता. घर सोडल्यानंतरही भाडेकरू एकदा मागच्या दरवाज्यानं घरात शिरला होता. मात्र त्यानं घरमालकाला भाडं दिलेलं नाही. एक वर्ष वाट पाहिल्यानंतर मालकाने भाडेकरूचे सामान काढण्यासाठी जबरदस्तीने घरात प्रवेश केला होता, परंतु घरात जे दृश्य उलगडेल ते त्याला आश्चर्यचकित करणारे होते.
मिळालेल्या माहितीनुसार, घरमालक नांदुरी रमेश यांनी 2019 मध्ये ऋषी नावाच्या व्यक्तीला त्यांचे घर भाड्याने दिले होते. घरात ऋषी आणि त्याची पत्नी राहत असत. ऋषीची पत्नी 2020 मध्ये तिच्या माहेरी गेली होती. पण ऋषीने मे 2021 मध्ये पत्नीला परत आणले. पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, प्राथमिक तपासात एक वर्षापूर्वी मृतदेहाचे तुकडे करण्यात आल्याचे समजते. घरमालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या प्रकरणाचा तपास करत आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

वर्षभरापासून बंद हाेते घर, दार उघडताच घरमालकाच्या पायाखालची जमीनच सरकली

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm