बेळगावात सीमावाद चिघळला...! महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक; ट्रक फोडले, जोरदार घोषणाबाजी

बेळगावात सीमावाद चिघळला...!
महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक;
ट्रक फोडले, जोरदार घोषणाबाजी

belgavkar.com | belgaum | belgavkar

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद

झेंडे हातात घेऊन आणि गाड्यांच्या टपावर चढून घोषणाबाजी

बेळगाव : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील गावांचा कर्नाटकात समावेश करण्याची तयारी दर्शवली होती. मुख्यमंत्री बोम्मई यांच्या वक्तव्य महाराष्ट्र कर्नाटकमधील सीमावाद पुन्हा तापला महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आता दिवसेंदिवस चिघळत असल्याचं दिसून येत आहे. हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्र पासिंगच्या ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.   हिरेबागवाडी येथे महाराष्ट्र पासिंगचे ट्रक लक्ष्य करण्यात आले आहेत. यात 4-5 ट्रकचं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्राच्याविरोधात कन्नड रक्षण वेदिकांची घोषणाबाजी सुरू असून कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे ट्रक रोखून त्यावर दगडफे केली. यावेळी कन्नड रक्षण वेदिका आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. शेकडो कार्यकर्त्यांनी हिरेबागवाडी येथे महाराष्ट्राचे ट्रक रोखून धरले. कार्यकर्ते लाल-पिवळे झेंडे हातात घेऊन आणि गाड्यांच्या टपावर चढून घोषणाबाजी करत आहेत. ट्रकच्या टपावर चढून आंदोलन करत आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगावात सीमावाद चिघळला...! महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक; ट्रक फोडले, जोरदार घोषणाबाजी
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm