कहाणी में ट्विस्ट...! जुळ्या बहिणींशी लग्न करणाऱ्या तरुणाचं सत्य कळलं अन् वधूपक्षाचं धाबंच दणाणलं

कहाणी में ट्विस्ट...!
जुळ्या बहिणींशी लग्न करणाऱ्या तरुणाचं सत्य कळलं अन् वधूपक्षाचं धाबंच दणाणलं

belgavkar.com | belgaum | belgavkar

दोन बायका फजिती ऐका;
जुळ्या बहिणींचा एकाच तरुणाशी विवाह

सोलापुरात एक अजब विवाह सोहळा शुक्रवार 2 डिसेंबर रोजी पार पडला. या विवाह सोहळ्याची चर्चा देशभर सुरु आहे. कारण एक वर आणि दोन वधू असा हा लग्नसोहळा होता. दोघी बहिणी आयटी इंजिनिअर आहेत. जुळ्या बहिणींचा जीव एकाच मुलावर जडल्याने दोघींनी त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मुलाचीही समंती मिळाल्याने थाटामाटात हा विवाह सोहळा पार पडला. मात्र आता तिघांच्या आनंदावर विरजण पडलं. एका तरुणाच्या लग्नाची देशभरात चर्चा सुरू होती. मुंबईच्या जुळ्या इंजिनिअर बहिणींशी या तरुणाने लग्न केलं आणि अडचणीत सापडला. महिला आयोगाने चौकशीचे आदेशही दिले. मात्र आता या प्रकरणात एक वेगळाच ट्विस्ट आला आहे.
पोलीस चौकशीत या तरुणाचा खरा चेहरा समोर आला आहे. त्यामुळे मुलीकडच्यांचेही धाबे दणाणले असणार. दोन जुळ्या बहिणींसोबत संसार थाटण्याची स्वप्नं पाहणाऱ्या अतुल अवताडेचं आधीच एक लग्न झालेलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला एक नवीन वळण लागणार आहे. अतुलच्या पहिल्या पत्नीने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. राज्य महिला आयोगाकडे त्याच्या पत्नीने दाद मागितली आहे. त्यामुळे आता अतुल सोबतच त्या जुळ्या बहिणींवरही गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर या लग्नाची जोरदार चर्चा सुरू होती. आता पुन्हा नव्याने हे प्रकरण गाजणार आहे.
माळशिरस येथे पार पडलेल्या लग्नाचे व्हिडिओ सोशल मीडियावर झपाड्याने व्हायरल झाले होते. यानंतर या प्रकरणी पोलिसांनी नवरदेवावर भारतीय दंड संहितेच्या कलम 494 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, तरुणाने 36 वर्षीय जुळ्या बहिणींशी लग्न केले. वधू आणि वराच्या कुटुंबीयांनी अशा लग्नाला होकार दिला होता. मात्र लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे लग्न वैध आहे की नाही? असा सवाल युजर्स विचारत होते. वडिलांचे निधन झाल्यानंतर जुळ्या बहिणी आईसोबत राहत होत्या. तर नवरदेव अतुल हा माळशिरस येथील असून तो मुंबईत ट्रॅव्हल एजन्सी चालवतो. काही दिवसांपासून मुली माळशिरस तालुक्यात आईसोबत राहत होत्या. दरम्यान अतुलने दोन्ही बहिणींना बरीच मदत केली होती, तेव्हापासून त्यांची जवळीत वाढली होती. मुलींची आई आजारी पडली, त्यावेळी अतुलने बरंच सहकार्य केलं होतं. दरम्यान अतुल दोन्ही जुळ्या बहिणींच्या जवळ आला. दोघांनी अतुलशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी दोन्ही बहिणींचे अतुलसोबत लग्न झाले, त्यानंतर या लग्नाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. स्थानिक पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी वरावर गुन्हा दाखल केला आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

कहाणी में ट्विस्ट...! जुळ्या बहिणींशी लग्न करणाऱ्या तरुणाचं सत्य कळलं अन् वधूपक्षाचं धाबंच दणाणलं
दोन बायका फजिती ऐका; जुळ्या बहिणींचा एकाच तरुणाशी विवाह

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm