देशात पहिल्यांदाच सोन्याची नाणी देणारं ATM हैदराबादमध्ये सुरू

देशात पहिल्यांदाच सोन्याची नाणी देणारं ATM हैदराबादमध्ये सुरू

belgavkar.com | belgaum | belgavkar

एटीएमची क्षमता 5 किलो सोने ठेवण्याची

एटीएम मशीनद्वारे सोन्याची नाणी काढण्याची अभिनव संकल्पना

हैदराबादमध्ये भारतातील पहिलं रिअल-टाइम गोल्ड एटीएम (Gold ATM) सुरू करण्यात आले आहे. या एटीएममधून पैसे नाही तर सोन्याची नाणी काढता येणार आहे. लोकं त्यात त्यांचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड टाकून सोन्याची नाणी खरेदी करू शकतात. एटीएमची क्षमता 5 किलो सोने ठेवण्याची आहे. यातून 0.5 ते 100 ग्रॅमपर्यंतची सोन्याची नाणी बाहेर येतील. याविषयी अधिक माहिती देताना गोल्डकॉइनचे उपाध्यक्ष प्रताप म्हणाले की, गोल्डकॉइन लिमिटेड कंपनीची स्थापना 4 वर्षांपूर्वी झाली. आमच्या सीईओला एटीएम मशीनद्वारे सोन्याची नाणी काढण्याची अभिनव संकल्पना सुचली. थोडं संशोधन केल्यावर कळलं की ते शक्य आहे. आम्ही हैदराबाद येथील ओपन क्यूब टेक्नॉलॉजीज या स्टार्ट-अप कंपनीशी करार केला आहे. दोन्ही कंपन्यांच्या इन हाऊस विभागाने त्यासाठी डिझाइन तयार केले.
एटीएममधून 8 प्रकारची नाणी बाहेर पडू शकतील
प्रताप म्हणाले की, एटीएमची खास गोष्ट म्हणजे ते सोन्याच्या बदलणऱ्या भावानुसार, त्याच्या किमती थेट अपडेट होणार. प्रत्येक एटीएममध्ये 5 किलो सोने ठेवण्याची क्षमता आहे, ज्याची किंमत सुमारे 2-3 कोटी रुपये आहे. एटीएम मशीन 0.5 ग्रॅम ते 100 ग्रॅम पर्यंतची नाणी वितरीत करते. यामध्ये 0.5 ग्रॅम, 1 ग्रॅम, 2 ग्रॅम, 5 ग्रॅम, 10 ग्रॅम, 20 ग्रॅम, 50 ग्रॅम आणि 100 ग्रॅमच्या नाण्यांचा समावेश आहे. ही नाणी 24 कॅरेट सोन्याची आणि 999 प्रमाणित आहेत.
आमच्याकडे आले होते. आम्हाला आशा आहे की अधिक लोक त्याचा वापर करतील. आम्ही हैदराबाद विमानतळ, जुने शहर, अमीरपेट आणि कुकटपल्ली येथे पुढील 3-4 मशीन्स बसवण्याची योजना आखत आहोत. आम्हाला करीमनगर आणि वारंगल येथूनही ऑर्डर मिळाले आहेत. आम्ही प्रथम तेलंगणावर लक्ष केंद्रित करत आहोत. ते म्हणाले की आम्ही दक्षिण भारतात पुढे जाऊ आणि कालांतराने देशभरात सुमारे 3,000 एटीएम सुरू करू. आम्ही जागतिक पातळीवर जाण्याचाही विचार करत आहोत.
एटीएम सुरक्षा वैशिष्ट्ये
एटीएमच्या सुरक्षेच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलताना ते म्हणाले की, एटीएममध्ये अंगभूत कॅमेरा आणि साउंड अलार्म सिस्टम आहे, ज्यामुळे कोणी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला तर ते सुरू होईल. आम्ही इतर एटीएमप्रमाणे आवश्यक सुरक्षा उपायांची आधीच काळजी घेतली आहे. आमच्याकडे 3 आऊटडोअर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत आणि आम्ही स्थानिक पोलिस ठाण्यांशीही जोडलेले आहोत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

देशात पहिल्यांदाच सोन्याची नाणी देणारं ATM हैदराबादमध्ये सुरू
एटीएमची क्षमता 5 किलो सोने ठेवण्याची

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm