कर्नाटक : खळबळजनक...! 5 जणांनी पकडलं, एकाने 9 वेळा डोक्यात दगड घातला; 30 वर्षीय व्यक्तीचा निर्घृण खून

कर्नाटक : खळबळजनक...!
5 जणांनी पकडलं, एकाने 9 वेळा डोक्यात दगड घातला;
30 वर्षीय व्यक्तीचा निर्घृण खून

belgavkar.com | belgaum | belgavkar

कर्नाटकातील बेंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 30 वर्षीय व्यक्तीचा निर्घृण खून करण्यात आला आहे. सहा जणांनी या व्यक्तीची दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. या खूनाचा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या खूनानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. केपी अग्रहारा परिसरात ही घटना घडली आहे. यामध्ये मृत झालेल्या व्यक्तीचे नाव बाळाप्पा आहे. तर, सहा आरोपीमध्ये तीन महिला आणि तीन पुरूष असून, अद्याप त्यांची ओळख पटलेली नाही. याबाबत ‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, 4 डिसेंबरच्या रात्री केपी अग्रहारा परिसरात काही जण चर्चा करत होते. तेव्हा काही कारणास्तव त्यांच्यात वाद झाला.

यातील पाच जणांनी बाळाप्पा याला खाली पाडले. तर, दुसऱ्या महिलेने जवळ असलेला दगड घेऊन त्याच्या डोक्यात घातला. त्यानंतर आणखी एका व्यक्तीने नऊवेळा डोक्यात दगड घातल्याने बाळाप्पाचा मृत्यू झाला. यानंतर घटनेनंतर सर्व आरोपींनी तेथून पळ काढला आहे. ही धक्कादायक घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी तीन विशेष पथके तयार केली आहे. त्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. “30 वर्षीय एका व्यक्तीचा केपी अग्रहारा येथील हेमंत मेडिकलसमोर रात्री 12.30 च्या सुमारास खून करण्यात आला. यामध्ये तीन पुरूष आणि तीन महिलांचा समावेश आहे,” अशी माहिती पश्चिम बेंगळुरूचे पोलीस आयुक्त यांनी ‘इंडिया टुडे’ला दिली.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

कर्नाटक : खळबळजनक...! 5 जणांनी पकडलं, एकाने 9 वेळा डोक्यात दगड घातला; 30 वर्षीय व्यक्तीचा निर्घृण खून

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm