बेळगाव प्रकरणाचे पुण्यात पडसाद...! पुण्यातील स्वारगेट स्थानकात कर्नाटकच्या बसेसवर ठाकरे गटाकडून ‘जय महाराष्ट्र’ची रंगरंगोटी

बेळगाव प्रकरणाचे पुण्यात पडसाद...!
पुण्यातील स्वारगेट स्थानकात कर्नाटकच्या बसेसवर ठाकरे गटाकडून ‘जय महाराष्ट्र’ची रंगरंगोटी

belgavkar.com | belgaum | belgavkar

पुण्यातील स्वारगेट बस डेपोत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून कर्नाटकच्या वाहनांना काळं फासलं

पुण्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा, कर्नाटकच्या गाड्यांना फासलं काळं

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद पेटला आहे. मंगळवारी दुपारी कर्नाटकमधील बेळगाव येथील हिरेबागवाडी टोल नाक्यावर महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली आहे. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील गाड्यांवर हल्लाबोल करत तोडफोड केली आहे. या प्रकराचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटले आहेत. पुण्यातील स्वारगेट बस डेपोत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून कर्नाटकच्या वाहनांना काळं फासलं आहे. त्यामुळे कर्नाटक महाराष्ट्रातील सीमावाद आणखी पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुण्यातील स्वारगेट बस डेपोत उभ्या असलेल्या कर्नाटक पासिंगच्या गाड्यांच्या नंबरप्लेटवर काळं फासण्यात आलं आहे.
हातात भगवे झेंडे घेऊन आलेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा दिल्या आहेत. तसेच कर्नाटकच्या बसेसवर ‘जय महाराष्ट्र’ असं लिहून रंगरंगोटीही करण्यात आली आहे. या प्रकरानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून त्यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला आहे.
खरं तर, दररोज शेकडो गाड्या कर्नाटकमधून महाराष्ट्रात येत असतात आणि तेवढ्याच गाड्या महाराष्ट्रातून कर्नाटकात जात असतात. अनेकदा या गाड्या विश्रांतीसाठी पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात उभ्या केल्या जातात. पण आता सीमावाद उफाळल्यानंतर ह्या बसेस ठाकरे गटाच्या निशाण्यावर आल्या आहेत. आज सकाळी बेळगावात कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक केली. यामध्ये सहा गाड्याच्या काचा फोडल्या आहेत. या प्रकरणाचे पडसाद आता पुण्यात उमटले असून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकच्या गाड्यांना काळं फासलं आहे. बसेसच्या काचांवर ‘जय महाराष्ट्र’ असंही लिहिण्यात आलं आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव प्रकरणाचे पुण्यात पडसाद...! पुण्यातील स्वारगेट स्थानकात कर्नाटकच्या बसेसवर ठाकरे गटाकडून ‘जय महाराष्ट्र’ची रंगरंगोटी
पुण्यातील स्वारगेट बस डेपोत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून कर्नाटकच्या वाहनांना काळं फासलं

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm