आ बैल मुझे मार...! बैलाने कंपनीच्या कार्यालयासमोर लघुशंका केल्याने थेट शेतकऱ्यावरच गुन्हा दाखल

आ बैल मुझे मार...!
बैलाने कंपनीच्या कार्यालयासमोर लघुशंका केल्याने थेट शेतकऱ्यावरच गुन्हा दाखल

belgavkar.com | belgaum | belgavkar

सिंगरेनी कोलरीज कंपनीच्या कार्यालयासमोर बैलाने लघुशंका केल्याने थेट शेतकऱ्यावर गुन्हा दाखल झाल्याचा प्रकार तेलंगणातील येन्नालाडू येथे उघडीस आला आहे. सुंदरलाल लोढा असं या शेतकऱ्याचे नाव आहे. कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन करत असताना हा प्रकार घडला. सुंदरलाल लोढा यांची जमीन सिंगरेनी कोलरीज कंपनीकडून अधिग्रहीत करण्यात आली होती. मात्र, लोढा यांना जमिनीचा योग्य तो मोबदला न मिळाल्याचा आरोप करत त्यांनी एसएससीएल व्यवस्थापकांच्या कार्यालयासमोर बैलगाडीत बसून आंदोलन सुरू केले.
दरम्यान, कार्यालयाच्या गेटसमोरच बैलाने लुघशंका केल्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज आधारे शेतकऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला. येन्नालाडू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीच्या तक्रारीनंतर शेतकऱ्याविरोधात भांदविच्या कलम 270 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

आ बैल मुझे मार...! बैलाने कंपनीच्या कार्यालयासमोर लघुशंका केल्याने थेट शेतकऱ्यावरच गुन्हा दाखल

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm