कोल्हे यांना बोलायला वेळ दिला, पण माइक का बंद का केला ? कोल्हे यांना काय बोलायचं होतं?
महाराष्ट्रात वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जी अपमानजनक वक्तव्य केली जात आहेत. त्यावर कायद्यात तरतूद व्हावी, फक्त छत्रपती शिवाजी महाराजच नाही, तर इतर महापुरुषांविषयी देखील बोलताना कायद्याची तरतूद करावी अशी मागणी, खासदार अमोल कोल्हे हे संसदेत करत होते, तेव्हा अमोल कोल्हे यांचं संपूर्ण बोलणं संपण्याआधी माईकचा आवाजचं संसदेच्या अध्यक्षांनी बंद केला, आणि ‘हो गया’, असं म्हटलं, त्यावर माईक बंद केल्यानंतरही अमोल कोल्हे यांनी, ‘हो गया नही अध्यक्ष महोदय, बोलने का मौका दिजिए’ असं म्हणत आपली भूमिका संसदेत सादर केली. यानंतर बाहेर येऊन खासदार अमोल कोल्हे यांनी या विरोधात आपला एक व्हिडिओ बनवला, त्यात संसदेत शिवाजी महाराजांविषयी बोलायला गेलो तर माईक बंद केला, माईक बंद केला तरी शिवाजी महाराजांविषयी भावना दाबता येणार नाहीत, तो तमाम शिवभक्तांचा आवाज, कानठळ्या बसवल्याशिवाय राहणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.