बेळगाव शहरातील घी गल्लीतील एका कोरोना संशयिताचा मृृृृत्यू झाल्याने घडली घटना - दगडफेक - Ambulance जाळली
सरकारी मालमत्तेचे नुकसान - कोरोना महामारीत घटना. बुधवारी रात्री 9.15 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात तणाव निर्माण.
19 तारखेला एका व्यक्तीला दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू असताना आज सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. हे समजताच नातेवाईकांनी एकच रुग्णालयासमोर गदारोळ निर्माण केला. अँम्बुलन्स ला आग लावून दगडफेक केली. ॲम्बुलन्स लागलेल्या आगीत जवळील वाहनाही इजा झाल्याचे समजते. एका विशिष्ट समाजाच्या जमावाने पोलिसांवरही दगडफेक केल्याचे समजते. इस्पितळातील डॉक्टर तसेच तेथे काम करणाऱ्या कर्मचारी वर्गांवर ही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यामुळे शहरातील विविध भागातून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. परिस्थिती नियंत्रणात असून संबंधितावर कारवाई होण्याची मागणी होत आहे.
पोलीसांच्या वाहनांवर दगडफेक, रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनाही मारहाणीचा प्रयत्न - पोलिस बंदोबस्तात वाढ
घटनास्थळी बेळगाव जिल्हा पोलीस आयुक्त के. त्यागराजन,जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, जिल्हा पंचायत सीईओ राजेंद्र के.व्ही. आदींनी भेट देऊन पहाणी केली आहे.
गुरुवार 23 जुलै- कर्मचार्यांचे धरणे आंदोलन : बिम्स हॉस्पिटल कर्मचार्यांवर हल्याचा प्रयत्न केल्यामुळे आज बिम्स कॉलेजसमोर कर्मचार्यांचे धरणे आंदोलन
काल घडलेल्या हिंसक घटनेचा निषेध
आतापर्यंत तिघांना अटक - 25 ते 30 जणांनी केली होती जाळपोळ व तोडफोड
ही घटना पूर्वनियोजीत होती काय...? घटनास्थळी पेट्रोल बाटल्या आल्या कुठुन...?
नर्सिंग विभाग व कर्मचारी आंदोलनात सहभागी
कोरोना वार्डमध्ये धूडगुस घालणार्या समाजकंटकांवर कारवाईची केली मागणी
हाॅस्पिटल परिसरात 144 कलम
बेळगाव जिल्हाधिकारी डॉ. एम. जी. हिरेमठ यांनी दिलेल्या आश्वासनानंतर बिम्स कर्मचार्यांचे आंदोलन मागे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिली कर्मचार्यांच्या सुरक्षिततेची ग्वाही.
belgavkar belgaum belgaum
belgaum belgavkar
belgaum belgavबेळगाव सिव्हील हाॅस्पिटल आवारातील धक्कादायक घटना : संतप्त नागरिकांनी पेटविली Ambulance गाड्यांवर दगडफेक
डॉक्टर व कर्मचाऱ्यांनाही मारहाण
Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm