अभिनेता सुधीर वर्माची आत्महत्या

अभिनेता सुधीर वर्माची आत्महत्या

belgavkar.com | belgaum | belgavkar

'Kundanapu Bomma' या चित्रपटामुळे सुधीरला वेगळी ओळख मिळाली

तेलुगू चिपत्रपट सृष्टीतील अभिनेता सुधीर वर्माने (33) आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र वर्माने विशाखापट्टनम येथील आपल्या राहत्या घरात आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. सुधीर वर्माच्या कुंडानापू बोम्मा चित्रपटातील सहकलाकाराने वर्माच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सुधीर वर्माने स्वामी रा रा (Swamy Ra Ra) या चित्रपटाच्या माध्यमातून 2013 साली चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. कुंडानापू बोम्मा (2016) या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत होता. सुधीर वर्माने आपल्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांत काम केले. मात्र कुंडानापू बोम्मा या चित्रपटामुळे सुधीरला वेगळी ओळख मिळाली. सुधीर वर्माने नेक्कू नाकू डॅश डॅश, सेकंड हँड या चित्रपटांतही महत्त्वाची भूमिका केली होती. मात्र मिळालेल्या माहितीनुसार मागील काही दिवसांपासून त्याला मनासारखे काम मिळत नव्हते. असे असले तरी वर्माच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

अभिनेता सुधीर वर्माची आत्महत्या
'Kundanapu Bomma' या चित्रपटामुळे सुधीरला वेगळी ओळख मिळाली

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm