बेळगाव : आक्षेपार्ह छायाचित्रे व्हायरलप्रकरणी एकाला अटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह छायाचित्रे आणि मजकूर

बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह छायाचित्रे आणि मजकूर व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. याप्रकरणी शहापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला होता. एका अनोळखीने छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू श्रीरामचंद्र, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांच्या छायाचित्रावर वादग्रस्त मजकूर लिहिण्यासह सोशल मीडियावर सदर छायाचित्र आणि मजकूर व्हायरल केला होता. त्यामुळे हिंदूधर्मियांची मने दुखावली होती.
याबाबत आमदार अभय पाटील यांनी पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांची भेट घेऊन सोशल मीडियावर देवदेवतांची छायाचित्रे व्हायरल करणाऱ्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यामुळे याप्रकरणी पोलिसांनी शहापूर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करुन घेतला होता. इम्रान पाशा अमिर जान (वय 19, रा. चौरड्डी पाळ्या, ता. चिंतामणी, जि. चिक्कबळापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शहापूरचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार एच., सीईएनचे पोलिस निरीक्षक संजीव कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास करुन आज एका संशयिताला अटक केली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : आक्षेपार्ह छायाचित्रे व्हायरलप्रकरणी एकाला अटक
छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह छायाचित्रे आणि मजकूर

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm