बेळगाव : चाकू हल्ल्यात दोघे जखमी

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : निपाणी येथील हिदायतनगरमध्ये चाकू हल्ल्याच्या घटनेत दोघेजण जखमी झाले. वाजीद इरफान बागवान (चिमगावकर गल्ली, निपाणी) व हैदर गुलमहंम्मद मुजावर (हिदायत नगर, निपाणी) अशी जखमींची नावे आहेत. त्यात हैदर गंभीर जखमी झाला. रविवारी रात्री 8च्या सुमारास घडलेल्या घटनेची नोंद रात्री उशीरा निपाणी पोलिसांत झाली आहे. माहिती अशी, वाजीदचा भाऊ साजीद हा क्रिकेट खेळण्यासाठी जाताना हैदरने त्याला क्रिकेट खेळण्यासाठी इकडे का ? अशी विचारणा करून दमदाटी केली.
यावेळी वाजीदने भावाकडे का विचारणा केली? म्हणून दोघांत वाद झाला. वादाचे पर्यवसाण हाणामारीत झाले. यावेळी हैदरने चाकू उगारला त्यात झालेल्या झटापटीत वाजीदच्या कंबरेजवळ तर हैदरच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांना प्राथमिक उपचारासाठी महात्मा गांधी रुग्णालयात दाखल केले. तेथून हैदरला पुढील उपचारासाठी बेळगाव येथील रुग्णालयात दाखल केलयं. वाजीद यथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. याप्रकरणी साजीद याने पोलिसात फिर्याद दिली आहे. हैदरच्या विरोधात खुनी हल्ल्याचा प्रयत्न असा गुन्हा दाखल झाला.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : चाकू हल्ल्यात दोघे जखमी

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm