बेळगावातून दोघांना हद्दपार

बेळगावातून दोघांना हद्दपार

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : मटका, जुगार आणि बेकायदा दारू विक्री अशा प्रकारच्या अवैद्य धंद्यात गुंतलेल्या बेळगाव ग्रामीण उपविभागातील बेळगाव ग्रामीण आणि मारिहाळ पोलिस ठाण्याच्या व्याप्तीतील दोघांना हद्दपार करण्यात आले आहे. लक्ष्मण ऊर्फ बाळू सातेरी पाटील (रा. बहाद्दरवाडी) आणि नागाप्पा शांताप्पा बागराई (रा. हुदली) अशी हद्दपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत. हा आदेश पोलिस उपायुक्त तथा विशेष कार्यनिर्वाहक दंडाधिकारी रवींद्र गडादी यांनी आज बजावला.
बेळगाव ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या बहाद्दरवाडी गावातील लक्ष्मण ऊर्फ बाळू हा अनेक वर्षांपासून गोवा बनावटीच्या दारू विक्रीचा व्यवसाय करीत होता. त्यामुळे त्याच्यावर यापूर्वी विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले आहेत. तरीही त्याच्या वर्तणुकीत सुधारणा झाली नाही.
त्याचबरोबर मारिहाळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हुदली गावातील नागाप्पा बागराई हा अवैध धंद्यात गुंतला होता. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे संबंधितांना हद्दपार करण्यात यावे, अशी शिफारस बेळगाव ग्रामीणचे सहायक पोलिस आयुक्त एस. व्ही. गिरीश यांनी पोलिस उपायुक्त गडादी यांच्याकडे केली होती. पोलिस उपायुक्त गडादी यांनी दोघांना बेळगाव जिल्ह्यातून कोप्पळ आणि बळ्ळारी जिल्ह्यात हद्दपार केले आहे. अवैध धंद्यात गुंतलेल्या विशेष करून मटका, जुगार बेकायदा मद्यविक्री करणाऱ्यांची माहिती स्थानिक पोलिस ठाण्यात द्यावी. संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगावातून दोघांना हद्दपार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm