PM मोदींचा दौरा होताच कर्नाटकाच्या माजी मुख्यमंत्र्यानं केली निवृत्तीची घोषणा; राजकीय चर्चांना उधाण

PM मोदींचा दौरा होताच कर्नाटकाच्या माजी मुख्यमंत्र्यानं केली निवृत्तीची घोषणा;
राजकीय चर्चांना उधाण

belgavkar.com | belgaum | belgavkar

येडियुरप्पा सध्या भाजपच्या केंद्रीय संसदीय समितीचे सदस्य आहेत

त्यांनी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली असली तरी....

कर्नाटक : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी (Karnataka Assembly Election) माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी मोठी घोषणा केलीये. येडियुरप्पांनी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीला अवघे दोन महिने शिल्लक असताना येडियुरप्पांनी ही घोषणा केल्यामुळं चर्चांना उधाण आलंय.
येडियुरप्पा सध्या भाजपच्या केंद्रीय संसदीय समितीचे सदस्य आहेत. त्यांनी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली असली तरी त्यांनी राजकारणात सक्रिय राहणार असल्याचं स्पष्ट केलंय.
माध्यमांशी बोलताना येडियुरप्पा म्हणाले, “मी आगामी विधानसभा निवडणूक लढवणार नाहीये. तसंच भविष्यात कोणतीही निवडणूक लढवण्याचा माझा विचार नाहीये. मी आता 80 वर्षांचा असल्यामुळं यापुढं मी निवडणूक लढवू शकत नाही. मात्र, यापुढं आपण सक्रिय राजकारणात राहणार असून, राज्यात पुन्हा भाजपचं सरकार आणणं हेच आपलं ध्येय असल्याचं त्यांनी सांगितलं.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

PM मोदींचा दौरा होताच कर्नाटकाच्या माजी मुख्यमंत्र्यानं केली निवृत्तीची घोषणा; राजकीय चर्चांना उधाण
येडियुरप्पा सध्या भाजपच्या केंद्रीय संसदीय समितीचे सदस्य आहेत

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm