Budget 2023 : बजेटपूर्वी गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी अपडेट...!
सामान्यांना सरकार देणार दिलासा?

belgavkar.com | belgaum | belgavkar

मोदी सरकारचा या टर्ममधील शेवटचा अर्थसंकल्प आहे.

मोदी सरकारचा या टर्ममधील शेवटचा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात मोदी सरकार सर्वसामान्यांना दिलासा देणार असल्याचे बोलले जात आहे. देशात सिलेंडरचे दर 1000 रुपयांवर गेले आहेत. सरकार सिलेंडरच्या किमती कमी करु शकतात असं बोलले जात होते. गेल्या काही महिन्यांपासून तेल कंपन्यांनी तेलाच्या दरात कोणताही बदल केलेला नाही, आता अर्थसंकल्पापूर्वी ग्राहकांना मोठा दिलासा सरकारने दिला आहे, घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या किमतीत वाढ झालेली नाही. आजही देशभरात गॅस सिलिंडरचे दर जैसे थेच आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी कोणत्याही प्रकारे दरात कपात केलेली नाही. गॅस सिलिंडरच्या दरांचे दर महिन्याच्या पहिल्या तारखेला IOCL द्वारे प्रसिद्ध केले जातात. सध्या देशभरात गॅस सिलेंडरचे दर एक हजार रुपयांच्या वर गेले आहेत. 
देशात घरगुती सिलिंडरचे दर
दिल्ली-रु. 1053, मुंबई-रु. 1052.5, कोलकाता-रु. 1079, चेन्नई-रु. 1068.5
व्यावसायिक सिलिंडरचे दर
दिल्ली-रु. 1769, मुंबई-रु. 1721, कोलकाता-रु. 1870, चेन्नई-1917 रु.
गेल्या वर्षभरात सिलिंडर 153.5 रुपयांनी महागला आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीतील शेवटचा बदल 6 जुलै 2022 रोजी करण्यात आला होता. गेल्या वर्षभरात घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती 153.5 रुपयांनी वाढल्या आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

Budget 2023 : बजेटपूर्वी गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी अपडेट..! सामान्यांना सरकार देणार दिलासा?
मोदी सरकारचा या टर्ममधील शेवटचा अर्थसंकल्प आहे.

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm