Budget 2023 : लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदीच्या दरावर होणार परिणाम

belgavkar.com | belgaum | belgavkar

सोने-चांदी आणि प्लॅटिनम महाग होणार आहे

सरकारने जुनी करप्रणाली रद्द केली.

अर्थसंकल्पात कस्टम ड्युटीबाबत सरकार काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज आपल्या भाषणात अर्थमंत्र्यांनी सांगितले की, लिथियम-आयन बॅटरीच्या निर्मितीसाठी कस्टम ड्युटीमध्ये सूट दिली जाईल. याशिवाय टेक्सटाइल वगळता मूळ कस्टम ड्युटी दर 21 वरून 13 पर्यंत कमी केला जाईल. त्याचबरोबर सोने आणि चांदीवरील कस्टम ड्युटी वाढवण्यात आली. त्यामुळे सोने-चांदी आणि प्लॅटिनम महाग होणार आहे.
याशिवाय येणाऱ्या काळात सिगारेटसाठी आणखी पैसे मोजावे लागणार आहेत. कारण अर्थसंकल्पात कस्टम ड्युटी 16 पर्यंत वाढवण्यात आली आहे. याशिवाय, सरकारने टेलिव्हिजनच्या खुल्या विक्रीच्या घटकांवरील कस्टम ड्युटी 2.5 टक्के कमी केली आहे. ज्या उत्पादनांवर कस्टम ड्युटी वाढते, त्या वस्तू महाग होतात. 
काय होणार स्वस्त?
एलएडी टिव्ही स्वस्त होणार
कॅमेरा लेन्स स्वस्त होणार
मोबाईल फोन टिव्ही स्वस्त होणार
इलेक्ट्रोनिक गाड्या स्वस्त होणार खेळणी, सायकल स्वस्त होणार
काय महागणार?
सिगारेट महागणार
विदेशी किचन चिमण्या महागणार
चांदीचे दागिने आणि भांडी महागणार
सोनं-चांदी, प्लॅटिनम महागणार

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

Budget 2023 : लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदीच्या दरावर होणार परिणाम
सोने-चांदी आणि प्लॅटिनम महाग होणार आहे

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm