आता कर्नाटकात 'आप'ची एन्ट्री; स्वबळावर लढणार 224 जागा, केजरीवालांची मोठी खेळी

आता कर्नाटकात 'आप'ची एन्ट्री;
स्वबळावर लढणार 224 जागा, केजरीवालांची मोठी खेळी

belgavkar.com | belgaum | belgavkar

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष आपला अजेंडा ठरवत आहे

दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यात होणाऱ्या निवडणुकीच्या (Karnataka Assembly Election) लढतीसाठी 'आप'नंही जोरदार तयारी सुरू केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पक्षानं राज्यातील सर्व 224 जागांवर उमेदवार उभं करणार असल्याचं जाहीर केलंय. आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi Party) नेत्या आतिशी यांनी याची घोषणा केली. आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष आपला अजेंडा ठरवत आहे. यावेळी आतिशी यांनी भाजप आणि काँग्रेसवरही जोरदार निशाणा साधला.
दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर भाजप 'नम्मा क्लिनिक'चं आश्वासन देत आहे, तर काँग्रेस 200 युनिट मोफत वीज देण्याचं खोटं आश्वासन देत असल्याचं आप नेत्यानं म्हटलंय. बंगळुरूमध्ये पत्रकारांशी बोलताना आप नेत्या आतिशी म्हणाल्या, आम्ही राज्यभरातील सर्व 224 विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवणार आहोत. मार्चच्या पहिल्या आठवड्यात उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. पक्षानं कर्नाटकात पूर्ण उत्साहानं निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी आप नेत्यानं सत्तेत आल्यास 200 युनिट मोफत वीज देण्याच्या काँग्रेसच्या आश्वासनाची खिल्ली उडवली.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

आता कर्नाटकात 'आप'ची एन्ट्री; स्वबळावर लढणार 224 जागा, केजरीवालांची मोठी खेळी
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष आपला अजेंडा ठरवत आहे

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm