बेळगाव : शेखर टेकन्नवर बेळगावचे नूतन डीसीपी

बेळगाव : शेखर टेकन्नवर बेळगावचे नूतन डीसीपी

belgavkar.com | belgaum | belgavkar

पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी यांच्यासह बेळगावातील 4 पोलीस अधिकाऱ्यांची बदली

मार्केटचे सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण बरमणी यांचीही बदली

बेळगाव : राज्यातील 13 आयपीएस अधिकाऱ्यांसह पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश जारी करण्यात आला आहे. यामध्ये पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी (DCP Law & Order) यांच्यासह बेळगावातील चार पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. कायदा व सुव्यवस्था विभागाचे नवे पोलीस उपायुक्त म्हणून शेखर टेकन्नवर यांनी आज बुधवारी आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली. कर्नाटक राज्य गृह विभागाने डीसीपी रवींद्र यांची बदली करून त्यांच्या रिक्तपदी शेखर टेकन्नवर यांना नियुक्त केले आहे.
विधानसभा निवडणूक लवकरच जाहीर होऊ शकते. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर तयारी केली जावी, असे संकेत राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना यापूर्वीच देण्यात आले आहेत. त्यामुळे मतदारकेद्रांची पाहणी करण्यासह मतदारयाद्यांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्यातच रवींद्र गडादी अधिकाऱ्यांच्या आता स्थानिक व एकाच ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून सेवा बजावणाऱ्या पोलीस बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यातील आयपीएस दर्जाच्या 13 अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. तर उपअधीक्षक दर्जाच्या तीन अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी यांची कमांड सेंटर बंगळूर येथे बदली झाली असून नूतन पोलिस उपायुक्त म्हणून म्हैसूर प्रशिक्षक केंद्रातील पोलिस अधीक्षक शेखर एच. टक्केण्णावर यांची नियुक्ती झाली आहे.
मार्केटचे सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण बरमणी यांची हनगंद उपविभाग बागलकोट येथे तर त्यांच्या जागी राज्य गुप्तचर खात्यातील प्रशांत सिद्दनगौडर, जिल्हा डीसीआरबीचे पोलीस उपअधीक्षक वीरेश दोडमनी यांची बळ्ळारी आयजीपी कार्यालयात कर त्यांच्या जागी ईशान्य विभाग आयजीपी कार्यालय गुलबर्गा येथील जेन्स लाय जेवीयन मेनेजस यांची, बेळगाव ग्रामीणचे सहाय्यक पोलिस आयुक्त एस. व्ही. गिरीश यांची सीसीबी हुबळी-धारवाड शहर तर त्यांच्या जागी वाहतूक पश्चिम उपविभाग बंगळूरचे गोपाळकृष्ण बी. गौडर यांची बदली झाली आहे. बदलीच्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने रुजू व्हावे, अशी सूचनाही करण्यात आली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : शेखर टेकन्नवर बेळगावचे नूतन डीसीपी
पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी यांच्यासह बेळगावातील 4 पोलीस अधिकाऱ्यांची बदली

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm