भाजपा आमदार ट्राफिकला वैतागला, कारमधून खाली उतरुन डिव्हाइडरवर जाऊन बसला अन्...

भाजपा आमदार ट्राफिकला वैतागला, कारमधून खाली उतरुन डिव्हाइडरवर जाऊन बसला अन्...

belgavkar.com | belgaum | belgavkar

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे अनधिकृत बांधकामाविरोधात भाजपा आमदार योगेश वर्मा यांचा पारा इतका चढता की ते रात्री 11 वाजता रस्त्याच्या दुभाजकावरच जाऊन बसले. अधिकाऱ्यांना फोन करुन तातडीनं अतिक्रमण हटवण्याची सूचना केली. हे प्रकरण लखीमपूर खीरीच्या बस स्टँडजवळचं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार लखीमपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेश वर्मा एका लग्न सोहळ्यातून परतत होते. यातच ते जवळपास अर्धातास एकाच जागी ट्राफिकमध्ये अडकून पडले होते. 
नाराज आमदार आपल्या कारमधून खाली उतरले आणि बस स्टँडजवळील पोलीस चौकीत गेले. उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना त्यांनी ट्राफिक आणि अतिक्रमण हटवण्यास सांगितलं. तर एका पोलिसानंच आमदार महाशयांना तिथून जाण्यास सांगितलं. याचा आमदार योगेश वर्मा यांना प्रचंड राग आला.  संतापाच्या भरात आमदार योगेश वर्मा रस्त्याच्या दुभाजकावरच जाऊन बसले आणि तिथूनच अधिकाऱ्यांनी फोन केला. मग पोलीस आणि प्रशासन अधिकाऱ्यांनी धाव घेतली. नगर पालिका अधिकाऱ्यांनी मग तातडीनं अनधिकृत बांधकाम हटवण्यास सुरुवात केली. 
आमदार योगेश वर्मा म्हणाले की, एका समारंभाहून घरी परतत असताना प्रचंड ट्राफिकचा सामना करावा लागला. मी एक आमदार म्हणून नव्हे, तर सर्वसामान्य नागरिक सांगतोय की जनतेला याचा खूप त्रास होतो. शहरात मी इतर ठिकाणच्याही अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची सूचना केली आहे'

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

भाजपा आमदार ट्राफिकला वैतागला, कारमधून खाली उतरुन डिव्हाइडरवर जाऊन बसला अन्...

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm