बेळगाव-बागलकोट रोडवर चचडीनजीक कार अपघातात जागीच ठार

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : चचडी (ता. सौंदत्ती) जवळ दोन कारची समोरासमोर टक्कर होऊन कारमधील एका वृद्धेचा मृत्यू झाला. तर अन्य सहा जण जखमी झाले आहेत. बेळगाव-बागलकोट रोडवर ही घटना घडली आहे. मुरगोड पोलीस स्थानकात अपघाताची नोंद झाली आहे. सुनंदा मारुती पाटील (वय 75, रा. गौंडन कुंदरगी, ता. गोकाक) असे अपघातात ठार झालेल्या वृद्धेचे नाव आहे. दोन्ही कारमधील सहा जण जखमी झाले असून त्यांना इस्पितळात हलविले आहे. मुरगोड पोलिसांनी पंचनामा केला आहे.
माहितीनुसार अपघातात ठार झालेल्या सुनंदा व त्यांचे कुटुंबीय सौंदत्ती यल्लम्मा यात्रेसाठी डोंगरावर गेल्या होत्या. यात्रेहून गावी परतताना दोन कारची समोरासमोर टक्कर होऊन ही घटना घडली आहे. मुरगोड पोलीस पुढील तपास करीत आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव-बागलकोट रोडवर चचडीनजीक कार अपघातात जागीच ठार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm