मोहम्मद पैगंबर आणि येशू ख्रिस्त यांचे पूर्वज सनातनी हिंदू

मोहम्मद पैगंबर आणि येशू ख्रिस्त यांचे पूर्वज सनातनी हिंदू

belgavkar.com | belgaum | belgavkar

शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांचा दावा

मोहम्मद पैगंबर आणि येशू ख्रिस्त यांचे पूर्वज सनातनी हिंदू होते असा दावा शंकराचार्य स्वामी निश्चलानंद यांनी केला आहे. अमेरिकेतल्या विरोधी पक्षाच्या सदस्यांनी त्यांच्या संसदेत हा मुद्दा उपस्थित केला होता. तेच उदाहरण देऊन स्वामी निश्चलानंद यांनी हा दावा केला आहे. भुवनेश्वरच्या कार्यक्रमात स्वामी निश्चलानंद यांनी हे वक्तव्य केलं आहे. या वक्तव्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच होत आहे.
पुरी येथील शंकराचार्य स्वामी निश्चलानंद यांनी म्हटलं आहे की मंदिरं आणि मठांवर सरकारचं नियंत्रण असायला नको. प्रत्येक ठिकाणी विकासकामांसाठी हे पैसे खर्च किंवा हा निधी खर्च करण्याची आवश्यकता नाही असंही वक्तव्य निश्चलानंद यांनी म्हटलं आहे. पुरी येथील रत्नभांडाराची चावी हरवली आहे त्याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की ओदिशा सरकार, जगन्नाथ मंदिर प्रशासन यांनी यासंदर्भात कुठलीही चर्चा केलेली नाही. रत्न भांडाराच्या प्रकरणांमध्ये मी हस्तक्षेप करावा का? असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे. द प्रिंटने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.
38 वर्षांपूर्वी हरवली पुरी मंदिरातली चावी : जगन्नाथ पुरी येथील मंदिरात सात रत्नभांडार आहेत. यापैकी चार भांडाराच्या चाव्या 38 वर्षांपूर्वी अचानक हरवल्या आहेत. त्याबाबत आता मी काय भाष्य करू? असा प्रश्न स्वामी निश्चलानंद यांनी विचारला आहे.
जोशीमठ येथील घटनांबाबत काय म्हणाले निश्चलानंद?
उत्तराखंड येथील जोशीमठ येथे घरं, इमारती आणि रस्ते यांना भेगा पडण्याचं प्रमाण वाढलं आहे. जोशीमठ येथील जमीनही खचते आहे. यावर स्वामी निश्चलानंद सरस्वती यांना विचारला असता स्वामी निश्चलानंद म्हणाले की पृथ्वी आणि पर्यावरण शुद्ध ठेवणं हे आपलं काम आहे. विकास हा शब्द आणि त्याभोवतीचा संदर्भ हा आपण प्रत्येकाने समजून घेतला पाहिजे. पृथ्वी, पाणी, हवा हे उर्जेचे स्रोत आहेत. प्रत्येक ठिकाणी विकास करण्याची आवश्यकता नाही असंही मत त्यांनी व्यक्त केलं.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

मोहम्मद पैगंबर आणि येशू ख्रिस्त यांचे पूर्वज सनातनी हिंदू
शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांचा दावा

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm