कर्नाटक निवडणुकीत पुन्हा त्रिशंकू परिस्थिती?

कर्नाटक निवडणुकीत पुन्हा त्रिशंकू परिस्थिती?

belgavkar.com | belgaum | belgavkar

काँग्रेस आणि भाजपाची कुमारस्वामींवर नजर

कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणूक होणार... याआधीच्या इतिहासाप्रमाणे यंदादेखील कर्नाटकमध्ये त्रिशंकू परिस्थिती.....

कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. याआधीच्या इतिहासाप्रमाणे यंदादेखील कर्नाटकमध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण होऊ शकते असं राजकीय जाणकारांना वाटत आहे. दरम्यान भारतीय जनता पार्टी आणि कांग्रेस या दोन्ही पक्षांचं जनता दल (सेक्युलर) या पक्षावर लक्ष आहे. राज्यातल्या अनेक विधानसभा मतदार संघांमध्ये जेडीएस हा पक्ष मजबूत स्थितीत आहे. त्यामुळेच दोन्ही पक्ष बहुमतासह सरकार स्थापन करण्यासाठी जेडीएसला मतदान होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहेत. कर्नाटकमधल्या नागरिकांनी जेडीएसला मतदान करू नये असं आव्हान भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून सुरू आहे. 2004, 2008, 2018 प्रमाणे 2023 मध्ये देखील निवडणुकीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी दोन्ही राष्ट्रीय पक्ष अशा मतदार संघांमध्ये रॅली काढत आहेत जिथे जेडीएस मजबूत स्थितीत आहे. जेडीएसच्या बालेकिल्ल्यांमध्ये दोन्ही पक्ष जोरदार प्रचार करत आहेत.
अमित शाह यांची रॅली : या आठवड्यात केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी येथे एक रॅली काढली. या रॅलीदरम्यान त्यांनी कर्नाटकमध्ये पूर्ण बहुमत मिळवून सरकार स्थापन करण्याची घोषणा केली. या क्षेत्रातील जास्तीत जास्त नागरिकांनी भाजपाला मतदान करावं असं आवाहन अमित शाह यांनी केलं.
जेडीएसला दिलेलं मत काँग्रेसलाच मिळणार : अमित शाह
अमित शाह म्हणाले की भाजपा हा राष्ट्रवादी पक्ष आहे. काँग्रेस आणि जेडीएसवर हल्लाबोल करत शाह म्हणाले की, “राज्यात एक पक्ष आहे ज्याला केवळ 25 ते 30 जागा जिंकायच्या आहेत. या जागा जिंकून हा पक्ष काँग्रेसच्या रथावर स्वार होऊन घराणेशाहीचं राजकारण करू पाहतोय. हा पक्ष म्हणजे जेडीएस. काँग्रेस आणि जेडीएस हे एकच आहेत. जेडीएसला दिलेलं मत हे काँग्रेसलाच मिळणार आहे.”
राज्यात काँग्रेसच विजयी होणार : सिद्धरामय्या
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी मंड्या येथील विधानसभा मतदार संघातील मतदारांना आवाहन केलं आहे की, त्यांनी आगामी निवडणुकीत जेडीएसला मतदान करू नये. सिद्धरामय्या मतदारांना म्हणाले की, “तुम्ही मागील निवडणुकीत इथल्या सातपैकी एकाही मतदार संघात काँग्रेसला विजयी केलं नाही. सर्व जागा जेडीएसने जिंकल्या. यावेळी असं करू नका. तुम्ही पुन्हा असं करणार का? तुम्ही मंड्या येथील 7 पैकी किमान 5 ते 6 जागा काँग्रेसला द्यायला हव्यात.”
सिद्धरामय्या म्हणाले की, “काँग्रेसचं लवकरच सत्तेत पुनरागमन होईल. तुम्ही काँग्रेसला मतदान करून सत्तेत भागीदार बनलं पाहिजे. जेडीएसचे नेते एचडी कुमारस्वामी म्हणतात की, ते 123 जागा जिंकतील. काँग्रेस पक्ष सोबत असताना त्यांचा पक्ष केवळ 58 जागा जिंकू शकला होता. त्यानंतर त्यांना केवळ 29 जागा मिळाल्या.”
जेडीएसचा काँग्रेसवर पलटवार : सिद्धरामय्या यांच्यावर पलटवार करत जेडीएसने म्हटलं आहे की, “काँग्रेस लोकांना सांगतंय की लोकांनी जेडीएसला मतदान करू नये, जेणेकरून जेडीएस पक्ष सत्तेबाहेर राहायला हवा. काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत सुरू असलेली गटबाजी या पक्षाला सत्तेवर येऊ देणार नाही. त्यांचे नेते एकमेकांचं तोंडदेखील पाहात नाहीत. ज्यांचं स्वतःच्या पक्षावर नियंत्रण नाही ते लोक माझ्या पक्षापद्दल बोलत आहेत.”

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

कर्नाटक निवडणुकीत पुन्हा त्रिशंकू परिस्थिती?
काँग्रेस आणि भाजपाची कुमारस्वामींवर नजर

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm