गिल हैं के मानता नहीं... तिसऱ्या T20 मध्ये भन्नाट शतक

गिल हैं के मानता नहीं... तिसऱ्या T20 मध्ये भन्नाट शतक

belgavkar.com | belgaum | belgavkar

भारताने 200 धावांसह विजयाचा पाया रचला

करो या मरो सामन्यात कशी फलंदाजी करायची, याचा उत्तम वस्तुपाठ हा शुभमन गिलने यावेळी दाखवून दिला. शुभमन गिल हा भन्नाट फॉर्मात आहे. आजच्या टी-20 सामन्यात धडाकेबाज फलंदाजी करत आपण आता थांबणार नसल्याचे दाखवून दिले. गिलने तुफानी फटकेबाजी केली आणि त्याच्या या जबरदस्त खेळीच्या जोरावर भारताला धावांचा डोंगर उभारता आला. वनडेमधील द्विशतकानंतर आता गिलने टी-20 क्रिकेटमध्ये शतक झळकावत आपल्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला आहे. गिलने या सामन्यात नाबाद 126 धावांची खेळी साकारली, त्याचे हे टी-20 क्रिकेटमधील पहिले शतक ठरले. या शतकाच्या जोरावर भारताला न्यूझीलंडपुढे 235 धावांचे आव्हान ठेवता आले.
हार्दिकने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी स्विकारली आणि भारताला दुसऱ्याच षटकात मोठा धक्का बसला. कारण भारताचा सलामीवीर इशान किशन हा यावेळी ब्रेसवेलसच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. इशानला यावेळी फक्त एकच धाव काढता आली. इशान बाद झाल्यावर राहुल त्रिपाठी हा फलंदाजीला आला आणि त्यानंतर गिल व त्रिपाठी यांनी भारताच्या धावसंख्येला चांगला आकार दिला. गिल आणि त्रिपाठी यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. यावेळी गिल आणि त्रिपाठी हे दोघेही अर्धशतक झळकावतील असे वाटत होते. पण त्रिपाठी बाद झाला आणि ही जोडी फुटली. त्रिपाठीने यावेळी फक्त 22 चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 44 धावांची तुफानी खेळी साकारली.
त्रिपाठीला अर्धशतक झळकावता आले नसले तरी गिलने ती कसर भरून काढली. गिलने यावेळी धडाकेबाज शतक झळकावले आणि चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. गिलने यावेळी 54 चेंडूंत आपले शतक साजरे केले. गिलने यावेळी चौकार लगावला आणि टी-20 क्रिकेटमधील आपले शतक पूर्ण केले. शतक पूर्ण केल्यावर गिल जास्त आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. कारण चौकारासह शतक पूर्ण केल्यावर त्याने लगेच षटकार लगावला आणि आपले इरादे स्पष्ट केले. गिलला यावेळी त्रिपाठीनंतर काही काळ सूर्यकुमार यादवने चांगली साथ दिली. पण सूर्याला यावेळी 24 धावांवर समाधान मानावे लागले. सूर्या बाद झाल्यावर कर्णधार हार्दिक पंड्या फलंदाजीला आला आणि त्याने गिलला सुयोग्य साथ दिली. शतक झळकावल्यावर अखेरच्या षटकांमध्ये गिलने आक्रमक फलंदाजी करत भारताची धावगती वाढवली.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

गिल हैं के मानता नहीं... तिसऱ्या T20 मध्ये भन्नाट शतक
भारताने 200 धावांसह विजयाचा पाया रचला

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm