video-husband-wife-fight-kidnapping-on-road-police-find-out-shocking-truth-behind-online-viral-clip-20230217.jpg | भररस्त्यातील अपहरणाचा ‘हा’ Video पाहून पोलीस 8 तास धावले; | belgaum news | belgavkar बेळगावकर

भररस्त्यातील अपहरणाचा ‘हा’ Video पाहून पोलीस 8 तास धावले;

belgavkar.com | belgaum | belgavkar

तपासात जे उघड झालं.. वाचून व्हाल थक्क


बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यातील अहियापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका मुलीचे अपहरण केल्याची घटना चर्चेत आहे. व्हायरल झालेल्या अपहरणाच्या व्हिडिओचे सत्य आता उघडपणे समोर आले आहे. या व्हायरल व्हिडीओची पडताळणी करता समोर आलेले सत्य पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, या व्हिडिओमध्ये एका तरुणीचे दिवसाउजेडी अपहरण होत असल्याचे सांगण्यात आले होते. यामध्ये आपण पाहू शकता की एक पुरुष महिलेला जबरदस्ती गाडीत बसवत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दिसणारे पूजा आणि चंदन हे दोघे जिल्ह्यातील एका खाजगी शाळेत शिकवतात. एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर वर्षभरापूर्वी दोघांनी लग्न केले. औरई पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या जोडप्यामध्ये भांडण झाले आणि पत्नीने त्याच दिवशी पतीचे घर सोडले. पत्नीच्या शोधात निघालेल्या चंदनने तिला अहियापूरमध्ये पाहिले. त्याने पूजाला थांबवले आणि तिला घरी परतण्यास सांगितले यावेळी पती पत्नीमध्ये थोडी तू तू मै मै झाली ज्यामुळे तो पुरुष अपहरण करत असल्याचे प्रथमदर्शनी वाटले.
मात्र परिसरातील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केल्यानंतर आणि अहियापूर पोलिसांनी 8 तास तपास केल्यानंतर संपूर्ण प्रकरणाचे सत्य समोर आले. सदर घटना ही अपहरणाची नसून पती-पत्नीमधील घरगुती वादामुळे उद्भवलेली आहे. अपहरणाचा कथित व्हिडिओ रविवारी व्हायरल झाला होता.
नवऱ्यानेच केलं बायकोचं अपहरण?
या जोडप्याने पोलीस ठाण्यात लेखी अर्ज सादर केला, आपल्यात भांडण झाल्याने सदर प्रकार घडल्याचा खुलासा एकमताने केल्यावर हे प्रकरण अहियापूर पोलीस ठाण्यात बंद करण्यात आले.