बेळगाव : कणबर्गी येथील निवासी घरकुल योजनेसाठी अखेर 127 कोटी रुपयांची निविदा

बेळगाव : कणबर्गी येथील निवासी घरकुल योजनेसाठी अखेर 127 कोटी रुपयांची निविदा

belgavkar.com | belgaum | belgavkar

लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार

बेळगाव : कणबर्गी येथील निवासी घरकुल योजना क्रमांक 61 साठी अखेर बुडाने (बेळगाव नगरविकास प्राधिकरण) 127 कोटी रुपयांची निविदा मागवली आहे. अल्पावधीची ही योजना असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार आहे. त्यावर बुडा कार्यालयात मंगळवारी झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या बुडाच्या कणबर्गी योजनेच्या निविदा प्रक्रियेला गेल्या महिन्यात राज्यस्तरीय समितीने मंजुरी दिली होती. पण, निविदेत तांत्रिक चूक झाल्यामुळे ती पुन्हा बोलावण्यात आली. जीएसटीसह 127 कोटी रूपयांची निविदा बोलावण्यात आली आहे. निविदा दाखल करण्यासाठी 21 दिवसांची मुदत असून त्यानंतर लवकरच काम करण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले.

buda belgaum urban development authority has finally tendered a tender of rs 127 crores for residential housing scheme kanbargi belgaum buda



residential housing scheme kanbargi belgaum buda बेळगाव belgavkar belgaum urban development authority



बेळगाव : कणबर्गी येथील निवासी घरकुल योजनेसाठी अखेर 127 कोटी रुपयांची निविदा
लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm