बेळगाव : खासबागातील गाळ्यांचे वितरण पारदर्शीपणे करावे

बेळगाव : खासबागातील गाळ्यांचे वितरण पारदर्शीपणे करावे

belgavkar.com | belgaum | belgavkar

शुभम शेळके यांचे मनपाला निवेदन

बेळगाव : बॅ. नाथ पै चौक ते खासबाग येथील बसवेश्वर चौकादरम्यान भाजी विक्रेत्यांसाठी गाळे उभारण्यात आले आहेत. गाळयांच्या उभारणीचे काम पुर्ण झाले तरी अद्याप वितरण करण्यात आले नाही. त्यामुळे गाळ्यांचे वितरण पारदर्शीपणे करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन युवा नेते शुभम शेळके यांनी उपमहापौर रेश्मा पाटील यांना बुधवारी दिले. खासबाग परिसरात दर रविवारी मोठ्याप्रमाणात बाजार भरतो. त्यामुळे भाजी विक्रेत्यांसाठी गाळयांची उभारणी करण्यात आली आहे. पण अद्याप वितरण करण्यात आले नाही.
खासबाग परिसरातील गाळयाचे वितरण पारदर्शीपणे करण्यात यावे, अशी मागणी शुभम शेळके यांनी महापौर-उपमहापौरांकडे केली आहे. तसेच मनपा कार्यालयात भगवा लावण्यात यावा, अन्यथा लाल-पिवळा ध्वज हटविण्यात यावा, अशी मागणी शुभम शेळके यांनी केली आहे.

distribution of shops in nath pai circle khasag should be done in a transparent manner belgaum बेळगाव belgavkar

shops was set up for vegetable sellers during Basaveshwar Chowk khasbag belgaum belgavkar

बेळगाव : खासबागातील गाळ्यांचे वितरण पारदर्शीपणे करावे
शुभम शेळके यांचे मनपाला निवेदन

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm