बेळगाव : बाची येथील चेकपोस्टवर 18 लाखांची रोकड जप्त

belgavkar.com | belgaum | belgavkar

महाराष्ट्राहून बेळगावला येत असताना ठेकेदाराला वाटेत अडवले व...

बेळगाव : बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्याच्या अखत्यारित बाची येथील चेकपोस्टवर 18 लाखांची रोकड जप्त करण्यात आली. महाराष्ट्राहून बेळगावला येत असताना ठेकेदाराला वाटेत अडवले व वाहनाची तपासणी करण्यात आली. या दरम्यान रोकड जप्त करण्यात आली असून प्राप्तिकर विभागाकडे पैसे व तपास वर्ग करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, महाराष्ट्राहून मोटारीतून येणाऱ्या एका ठेकेदाराला बाचीत पथकाने अडविले आणि त्याची चौकशी केली.
या दरम्यान ठेकेदाराकडून समर्पक उत्तरे मिळाली नाहीत. शिवाय वाहनातील रोख रकमेबाबत कागदपत्रे सादर करता आली नाहीत. यामुळे बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्याच्या अखत्यारित बाची येथील चेकपोस्टवर रोकड जप्त केली आहे. विधानसभा निवडणुकीनिमित्त चेकपोस्ट व भरारी पथके स्थापली आहेत. बेळगाव शहर, तालुका आणि जिल्ह्यात पथके कार्यान्वित आहेत. पथकातर्फे निवडणुकीपूर्वी अनेक भागात कारवाई करत 4 कोटींपेक्षा अधिक रक्कम जप्त केली आहे. त्यामध्ये शुक्रवारी परत 18 लाखांची भर पडली आहे.
ठेकेदाराकडे दाखले आणि स्पष्टीकरण विचारले असता स्पष्टीकरण देता आले नाही. यामुळे योग्य दाखले सादर करण्याचे निर्देश संबंधित पथकाकडून देण्यात आले आहेत. दरम्यान, याबाबतची कारवाई करण्यात आल्यानंतर बेळगाव ग्रामीण पोलिसांना त्याची कल्पना देण्यात आली असून आयटी विभागालाही याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

18 lakh cash seized at the check post in Bachi belgaum बेळगाव belgavkar belgaum

While coming from Maharashtra to belgaum the contractor was stopped on the way election check post in Bachi belgaum

बेळगाव : बाची येथील चेकपोस्टवर 18 लाखांची रोकड जप्त
महाराष्ट्राहून बेळगावला येत असताना ठेकेदाराला वाटेत अडवले व...

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm