बेळगाव-खानापूर : कोणतेही ठोस लेखी कारण न देता केवळ मराठी आणि समितीच्या आकसापोटी अधिकाऱ्यांनी पोलिस बंदोबस्तात मंगळवारी खानापूर म. ए. समितीच्या कार्यालयावरील फलक पुन्हा हटविला. त्यामुळे समितीच्या कार्यकर्त्यांनी महामार्गावर ठिय्या आंदोलन केले. मुजोर प्रशासनाचा निषेध केला तसेच याबाबत राज्य व केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचा व न्यायालयात जाण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
belgavkar
समितीला टार्गेट करण्याचे धोरण अवलंबिले असल्याने ऐन प्रचाराच्या रणधुमाळीत समिती कार्यकर्त्यांवर नाहक दबाव तंत्राचा वापर केला जात आहे. फलकाच्या आकाराचे कारण देत निवडणूक अधिकाऱ्यांनी 10 दिवसांपूर्वी समिती कर्यालयावरील फलक हटविला होता. नगरपंचायतची रितसर परवानगी घेतली असताना तसेच फलकावर कोणतेही चिन्ह किंवा उमेदवाराचे नाव नसतानाही फलक हटविला.
तालुक्यातून मराठी अस्मिता संपविण्याचा प्रशासनाने डाव आखला आहे. निवडणूक विभागाने तटस्थपणे आपली भूमिका बजावणे आवश्यक असताना मराठी द्वेष्ट्यांनी केलेल्या तक्रारीचे निमित्त पुढे करून फलक हटवण्याची केलेली कारवाई निषेधार्ह आहे. राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यासाठी तयारी सुरू आहे. - यशवंत बिर्जे, कार्याध्यक्ष, म. ए. समिती
निवडणूक आयोगाकडे तक्रार करणारखानापूर येथील महाराष्ट्र एकीकरण समितीचा फलक बेकायदेशीरपणे फलक हटवण्यात आला असून याविरोधात आम्ही राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करू, अशी माहिती अॅड. महेश बिर्जे यांनी दिली आहे.