...अन् टाटांच्या पदरात अ‍ॅपलची जबाबदारी आली'; जगभरात कॉलर ताठ करणारी कहाणी

...अन् टाटांच्या पदरात अ‍ॅपलची जबाबदारी आली';
जगभरात कॉलर ताठ करणारी कहाणी

belgavkar.com | belgaum | belgavkar

टाटांना ही संधी मिळाल्याचा अर्थ काय होतो

Apple iPhone 15 and 15 Plus to be manufactured in India by Tata Group (manufacturing iPhone in Bengaluru)

कर्नाटक-बेंगळूरु : टाटा समूहाने नुकचेट विस्ट्रॉन कॉर्प या कंपनीचा एक कारखाना विकत घेतला आहे. ही तैवानची विस्ट्रॉन कॉर्प कंपनी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असून, हीच कंपनी भारतात आयफोन तयार करत होती. ट्रेंड फोर्स या रिसर्च फर्मनुसार, आता टाटा ग्रुप भारतात आयफोन बनवणार आहे. मात्र ही जबाबदारी टाटांकडे येण्यामागं मोठी रंजग कहाणी आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे टाटा ही अ‍ॅपलची चौथी काँट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरर कंपनी असणार आहे. टाटा व्यतिरिक्त फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुप, पेगाट्रॉन कॉर्प आणि लक्सशेअर प्रिसिजन इंडस्ट्री कॉर्पोरेशन आयफोन तयार करतात. या तिन्ही तैवानच्या कंपन्या आहेत.
ट्रेंडफोर्सने आपल्या एका ब्लॉग पोस्टमध्ये याबद्दल माहिती दिली आहे की टाटाला आयफोन 15 आणि आयफोन प्लस मॉडेलसाठी ऑर्डर देखील मिळाल्या आहेत. जे या वर्षाच्या अखेरीस लाँच केले जाणार आहेत. याचाच अर्थ असा होतो की भारत हा त्या देशांपैकी एक असू शकतो जिथे नवीन आयफोन सीरीजचे फोन सर्वात आधी लॉन्च केले जातील. तसेच असेही मानले जात आहे की ग्लोबल ऑर्डरपैकी 5 टक्के ऑर्डर्स या टाटाला दिल्या जातील. ट्रेंडफोर्सच्या मते, अ‍ॅपल ही सुरुवातीला नवीन उत्पादकांना लहान ऑर्डर देते.
पण टाटांना ही संधी मिळाली कशी?
टाटाने अ‍ॅपलचे फोन बनवण्याची योजना आखली आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये यासंबंधीची माहिती समोर आली होती. टाटा अ‍ॅपलसाठी कंपोनंट्स मॅन्युफॅक्चर करण्याऱ्या प्लांटमध्ये 5,000 कोटींची गुंतवणूक करत असल्याचे बातमीत म्हटले होते. त्या रिपोर्टनुसार तामिळनाडू इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने टाटा समूहाची नवीन कंपनी टाटा इलेक्ट्रॉनिक्सला होसूर येथील एका इंडस्ट्रियल कॉम्लेक्समध्ये 500 एकर जमीन दिली असल्याचे म्हटले होते. टाटा तेव्हापासून अ‍ॅपलच्य मॅन्युफॅक्चरिंग काँट्रॅक्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. यानंतर नोव्हेंबर 2022 मध्ये बातमी आली की टाटा ग्रुप आणि विस्ट्रॉन ग्रुप यांच्यात बोलणी सुरू आहेत. या वर्षी जानेवारीमध्ये, टाटा आणि विस्ट्रॉन यांच्यातील बोलणी जवळपास पूर्ण झाल्याची बातमी आली. या महिन्याच्या सुरुवातीला, विस्ट्रॉन ग्रुपने भारतातील त्यांचे कामकाज बंद करण्याची घोषणा केली.
टाटा समूहाने विस्ट्रॉनचा प्लांट विकत घेण्याचा विचार केला आणि तो विकत घेतला हे इतकं सोप्पं नव्हतं. विस्ट्रॉन इंडियाच्या खराब प्रॅक्टिसेसचा देखील यामध्ये मोठा वाटा राहिला आहे. तैवानची कंपनी विस्ट्रॉन कॉर्पने 2006 मध्ये भारतीय उप-ब्रँड विस्ट्रॉन इंडिया लाँच केली. त्याचे मुख्यालय बंगळुरू येथे करण्यात आले. डिसेंबर 2020 मध्ये, विस्ट्रॉन इंडियाच्या नरसापूरस्थित आयफोन उत्पादन प्रकल्पातील कामगारांनी आंदोलन सुरू केले. कामगारांनी सांगितले की, त्यांना जास्त तास काम करायला लावले जाते आणि त्यांना त्यांचे वेतन वेळेवर दिले जात नाही. या निदर्शनाला हिंसक वळण लागले आणि कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या वाहनांची आणि मशीन्सची तोडफोड केली. या प्रकारानंतर कर्नाटक सरकारने विस्ट्रॉन इंडियाच्या लेबर प्रॅक्टिसेसची चौकशी सुरू केली. सरकराला त्यामध्ये अनेक नियम मोडल्याचे आढळून आले. ज्यामध्ये कामगारांना वेळेवर पगार न देणे, खराब वातावरणात काम करवून घेणे याचा समावेश होते. त्यानंतर कर्नाटक सरकारने विस्ट्रॉनला राज्य प्रोड्युसर लिस्टमधून काढून टाकलं. अ‍ॅपलनेही या घटनेनंतर विस्ट्रॉनची चौकशी सुरू केली होती.
फेब्रुवारी 2021 मध्ये अ‍ॅपलने सांगितले होते की विस्ट्रॉन भारतात पुन्हा उत्पादन सुरू करू शकते, परंतु त्याविरुद्धची चौकशी सुरूच राहील. यापूर्वी 2019 मध्ये, कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने कंपनीवर पर्यावरण कायद्यांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तपासणीत ही कंपनी प्रक्रिया न केलेला कचरा तसेच टाकत असून त्यामुळे भूजल प्रदूषित होत असल्याचे समोर आले.
टाटांना ही संधी मिळाल्याचा अर्थ काय होतो
ब्लूमबर्गने या वर्षी जानेवारीमध्ये रिपोर्ट दिला की, टाटाने विकत घेतलेल्या मॅन्युफॅक्चरिग प्लांटमधील सर्व आठ आयफोन असेंब्ली लाइन आणि सुमारे 10,000 लोकांचे कर्मचारी यांचा समावेश आहे. टाटाने विकत घेतलेला कारखाना भारताच्या आयटी हब बेंगळुरूपासून सुमारे 50 किमी अंतरावर आहे आणि 2.2 दशलक्ष चौरस फूट क्षेत्रात पसरलेला आहे. अ‍ॅपल बऱ्याच दिवसांपासून चीनमधून आपली मॅन्युफॅक्चरिंग सप्लाय चेन लवण्याचा प्रयत्न करत आहे. ट्रेंडफोर्सच्या मते, अ‍ॅपल आपल्या सप्लाय सोर्सेसमध्ये विविधता आणण्यावर भर देत आहे. अशा परिस्थितीत भारत अ‍ॅपलसाठी चांगला पर्याय ठरू शकतो. अलीकडेच Apple ने मुंबई आणि दिल्ली येथे त्यांचे पहिले दोन Apple Store लाँच केले.

Apple iPhone 15 and 15 Plus to be manufactured in India by Tata Group

Tatas get a bite of Apple start manufacturing iPhone in Bengaluru

...अन् टाटांच्या पदरात अ‍ॅपलची जबाबदारी आली'; जगभरात कॉलर ताठ करणारी कहाणी
टाटांना ही संधी मिळाल्याचा अर्थ काय होतो

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm