कमाल...! WhatsApp वर आता चॅट लॉक करता येणार;

कमाल...!
WhatsApp वर आता चॅट लॉक करता येणार;

belgavkar.com | belgaum | belgavkar

खासगी संवादाला मिळणार 'सुरक्षा कवच'

WhatsApp Chat Lock : मेटाने WhatsApp च्या नवीन फीचरची घोषणा केली आहे. युजर्स या फीचरची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. कंपनी या फीचरची बीटा व्हर्जनवर खूप दिवस चाचणी करत होती. आता ते सर्व युजर्ससाठी केलं गेलं आहे. हे फीचर युजर्सच्या चॅट सिक्युरिटीसाठी आहे. WhatsApp वर आपल्याला एंड-टू-एंड एन्क्रिप्शन मिळतं. मात्र यानंतरही कोणाच्या हातात जर आपला अनलॉक फोन लागला तर तो चॅट्स एक्सेस करू शकत होता, पण आता असं होणार नाही. अशा परिस्थितीसाठी कंपनीने प्लॅटफॉर्मवर एक नवीन सिक्यारोटी फीचर जोडलं आहे. त्याच्या मदतीने चॅट लॉक करू शकता.
WhatsApp चॅट लॉकचे फीचर सर्व युजर्ससाठी आणले गेले आहे. त्याच्या मदतीने, युजर्स समूह किंवा वैयक्तिक चॅट लॉक करू शकतात. या फीचरनंतर, फक्त तुम्ही तुमच्या चॅट्समध्ये प्रवेश करू शकाल. यासाठी तुम्हाला डिव्हाईस पिन किंवा बायोमेट्रिक्स लॉक वापरावे लागेल. हे फीचर फिंगरप्रिंट लॉक किंवा फेस लॉकसह देखील कार्य करते. म्हणजेच, जर तुम्ही चॅट लॉक केले असेल तर ते उघडण्यासाठी तुम्हाला पिन, फिंगरप्रिंट किंवा फेस लॉकचा वापर करावा लागेल. तुम्ही चॅट लॉक करताच, WhatsApp त्या संभाषणातील मजकूर चॅट नोटीफिकेशनमध्ये लपवतं. WhatsApp हे खास आणि हटके फीचर वापरण्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. सर्वप्रथम तुम्हाला App ओपन करावे लागेल. यानंतर तुम्हाला कोणत्याही चॅटवर (पर्सनल किंवा ग्रुप) जावे लागेल.
इंडिविज्युएल किंवा ग्रुपच्या नावावर टॅप करावे लागेल. येथे तुम्हाला स्क्रोल करून खाली जावे लागेल जिथे तुम्हाला लॉक चॅटचा पर्याय मिळेल. आता तुम्हाला तुमचा पासवर्ड किंवा बायोमेट्रिक्स व्हेरिफाय करावे लागतील. अशा प्रकारे तुम्ही कोणतंही चॅट लॉक करू शकता. हे फीचर सर्व युजर्साठी आणलं गेलं आहे. येत्या काही दिवसांत हे फीचर सर्व युजर्ससाठी उपलब्ध होणार आहे. जर हे फीचर तुमच्या WhatsApp वर दिसत नसेल तर तुम्हाला App अपडेट करावं लागेल. WhatsApp हे संवाद साधण्याच प्रभावी माध्यम आहे. यामुळे व्हिडीओ, फोटो सह महत्त्वाच्या फाईल शेअर करणं सोपं होतं. WhatsApp ही आपल्या युजर्सचं चॅटींग आणखी मजेशीर व्हावं म्हणून सातत्याने नवनवीन फीचर आणत असतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

whatsapp chat lock feature roll out here how to lock chats

WhatsApp Chat Lock : Making Your Most Intimate Conversation Even More Private

WhatsApp adds chat lock feature to safeguard private conversations

WhatsApp Chat Lock

कमाल...! WhatsApp वर आता चॅट लॉक करता येणार;
खासगी संवादाला मिळणार 'सुरक्षा कवच'

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm