बेळगाव : शिवजयंती चित्ररथ मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. त्यासाठी शनिवारी शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. प्रमुख मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. राणी चन्नम्मा चौकातून खानापूरकडे जाणारी वाहने क्लव रोडमार्गे गांधी सर्कल, शौर्य चौक, केंद्रीय विद्यालय क्र. 2, शर्कत पार्क, ग्लोब सिनेमागृह समोरुन खानापूर रोडवर वळवण्यात आली आहे. देशपांडे पेट्रोल पंप, नरगुंदकर भावे चौक, कंबळी खूट, पिंपळ कट्टा, पाटील गल्लीकडे जाणारी वाहने जिजामाता सर्कलमधून जुन्या पी. बी रोडवरुन पुढे जातील.
belgavkar
गोवावेस सर्कल आणि नाथ पै सर्कलमधून बँक ऑफ इंडिया सर्कलमार्गे कपिलेश्वर उड्डाण पुलाकडे जाणारी वाहतूक बँक ऑफ इंडिया सर्कलमधून कुलकर्णी गल्ली, वैभव हॉटेल क्रॉस, जुना पी. बी. रोडवरुन पुढे जातील. जुना पी. बी. रोड, व्हीआरएल लॉजिस्टीक व भातकांडे स्कूल क्रॉसमार्गे कपिलेश्वर उड्डाण पुलावरुन जाणारी वाहतूक भातकांडे स्कूल क्रॉससमोरुन शिवाजी गार्डन, बँक ऑफ इंडिया क्रॉस ते महात्मा फुले क्रॉस मार्गे पुढे जातील. जुना पी. बी. रोड, यश रुग्णालय, महाव्दार रोड, कपिलेश्वर मंदिर रोडने जाणारी वाहने यश रुग्णालयासमोरुन तानाजी गल्ली, रेल्वे फाटकातून पुढे जाणार आहेत.
गुड्स शेड रोडवरुन कपिलेश्वर उड्डाण पुलावरुन जाणारी वाहतूक रेणुका हॉटेल, एसपीएम रोडवरुन मराठा मंदिर गोवावेस सर्कलकडे जातील. खानापूर रोड, बीएसएनएल क्रॉस, स्टेशन रोड आणि गोगटे सर्कल, रेल्वे स्टेशन, पोस्टमन सर्कलकडुन शनी मंदिरकडे जाणारी वाहतूक ग्लोब सर्कलसमोरुन शर्कत पार्क, केंद्रीय विद्यालय क्र. 2, शौर्य चौक, गांधी सर्कल, क्लब रोड, चन्नम्मा सर्कलकडे जाईल.मिरवणूक मार्ग वाहनांसाठी बंदचन्नम्मा सर्कलपासून कॉलेज रोड ते धर्मवीर संभाजी चौकापर्यंतची वाहतूक व्यवस्था मिरवणूक संपेपर्यंत बंद असणार आहे. मिरवणूक मार्गावरील वाहतूक दुपारी दोनपासून बंद असणार आहे. त्यामुळे, वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.