नाल्यातील पाणी घ्यायचा अन्…, नारळपाणी विक्रेत्याचं किळसवाणं कृत्य कॅमेऱ्यात कैद

नाल्यातील पाणी घ्यायचा अन्…, नारळपाणी विक्रेत्याचं किळसवाणं कृत्य कॅमेऱ्यात कैद

belgavkar.com | belgaum | belgavkar

संतापजनक Video व्हायरल

उत्तर प्रदेशातील गौतम बुद्धनगर जिल्ह्यातील ग्रेटर नोएडा येथील एक किळसवाणा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक नारळपाणी विक्रेता नारळावर नाल्यातील पाणी शिंपडताना दिसत आहे. एका निवासी सोसायटीबाहेरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे, तसंच हा लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार असल्याचंही नेटकरी म्हणत आहे. व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताच, पोलिसांनी या घटनेची चौकशी करुन त्या नारळपाणी विक्रेत्याला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ ग्रेटर नोएडा वेस्ट येथील राधा स्काय गार्डन सोसायटीजवळचा आहे. व्हिडीओमध्ये, एक नारळपाणी विकणारा तरुण नाल्यातील पाणी विक्रीसाठी ठेवलेल्या नारळावर शिंपडताना दिसत आहे. नारळपाणी विक्रेत्याच्या या किळसवाण्या कृत्याचा व्हिडीओ काही लोकांनी शूट केला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. व्हिडीओ पोस्ट करताच तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
आरोपीला केली अटक : या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करताना काही लोकांनी तो पोलिसांना टॅग केला आणि याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर बिसरख पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत नारळपाणी विक्री करणाऱ्या आरोपीला अटक केली. पोलिसांनी सांगितलं आरोपी मुळचा बरेली येथील असून त्याचं नाव समीर असं आहे. तर स्टेशन प्रभारी अनिल राजपूत म्हणाले, “सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये नारळावर नाल्यातील पाणी शिंपडल्याचं दिसत होतं. ट्विटरवरून केलेल्या तक्रारीनंतर आम्ही आरोपीला अटक केली.”

Man Drain Water Was Sprinkling On Coconut Noida Police Caught After Video Surfaced

Drain Water Was Sprinkling On Coconut

नाल्यातील पाणी घ्यायचा अन्…, नारळपाणी विक्रेत्याचं किळसवाणं कृत्य कॅमेऱ्यात कैद
संतापजनक Video व्हायरल

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm