VIDEO : फाडफाड इंग्रजी बोलणारे प्रोफेसर विकतायत मोमोज

VIDEO : फाडफाड इंग्रजी बोलणारे प्रोफेसर विकतायत मोमोज

belgavkar.com | belgaum | belgavkar

अवघ्या 2 तासात सगळे मोमोज होतात फस्त

स्ट्रीट फुड म्हणून मोमोज (Momos) आता अल्पावधीतच लोकप्रिय झालं आहे. हिमालयाची फेमस डिश असलेल्या मोमोजचे स्टॉल आता गल्लीगल्लीत सुरू झाले आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेल्या मोमोज अनेकांचे फेव्हरेट फुड झाले आहे. त्यात स्ट्रीट फुड म्हटले की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. हिमालयाची फेमस डिश असली तरी आता अगदी मराठी माणसापासून बाहेरच्या राज्यातील लोकांपर्यंत कुणीही मोमोज विकू शकतो.
सध्याच्या काळात व्यवसाय करणं वाटतं तितकं सोपं राहिलेलं नाही. व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा वाढली आहे, त्यामुळे इतरांपेक्षा आपल्या दुकानातील मालाची जास्त विक्री करण्यासाठी दुकानदारांना वेगवेगळे उपाय शोधावे लागत आहेत. काही दुकानदार ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्याच्या बाबतीत खूप हुशार असतात. असे लोक काहीही जुगाड करुन आपल्या दुकानातील मालाची विक्री करतात. दरम्यान सध्या सोशल मीडियावर मोमोज विकणाऱ्या एका काकांचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. याचं कारण म्हणजे त्यांची मोमोज विकण्याची पद्धत, ते ज्याप्रकारे ग्राहकांना मोमज खाण्यासाठी आकर्षित करत आहेत, हे पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. कारण हा व्यक्ती फाडफाड इंग्लीश बोलत मोमोज विकत आहे.
फाडफाड इंग्रजी बोलणारे प्रोफेसर विकतायत मोमोज
दरम्यान हा व्यक्ती दुसरा तिसरा कुणी नसून एका कॉलेजमध्ये चक्क प्रोफेसर म्हणून काम करतो. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यापारी विविध पद्धतीने आपल्या वस्तू विकतात. अशात रस्त्यावर छोटा स्टॉल लावून एक व्यक्ती मोमोज विकत आहे. मोमोज विकताना हा व्यक्ती आपल्या ग्राहकांना हिंदीमध्ये नाही तर इंग्रजी भाषेत बोलून माहिती देत आहे. सदर व्यक्ती एक इंग्रजीचे शिक्षक आहेत. नोकरी आणि बेरोजगारीमुळे त्यांनी अशा पद्धतीने मोमोज विकण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ते कधी स्पीकर्सचा वापर करतात, तर कधी ठिकठिकाणी पोस्टर आणि बॅनर लावून आपल्या दुकानाची जाहिरात करतात. पण सध्या या व्यक्तिच्या हुशारीने त्याचा चांगलाच धंदा होत आहे.


English Professor Selling Homemade Momos In Lucknow Marketing Style Viral Video

English Professor Selling Momos with Badam Ki Chutney

VIDEO : फाडफाड इंग्रजी बोलणारे प्रोफेसर विकतायत मोमोज
अवघ्या 2 तासात सगळे मोमोज होतात फस्त

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm