युवराज सिंगच्या घरी आली चिमुकली परी;

युवराज सिंगच्या घरी आली चिमुकली परी;

belgavkar.com | belgaum | belgavkar

लेकीचा चेहरा दाखवून सांगितलं नाव, अर्थही आहे खास

Yuvraj Singh Welcomes New Born Baby Girl : भारतीय अष्टपैलू माजी क्रिकेटपटू युवराज सिंग व पत्नी हेझल कीच यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे. युवराजने आपल्या गोड चौकोनी कुटुंबाचा सुंदर फोटो शेअर करत ही गोड बातमी दिली आहे. “आम्ही आमच्या छोट्या राजकुमारी ‘ऑरा’चे स्वागत करत आहोत. आमचे चौकोनी कुटुंब पूर्ण करणाऱ्या या राजकुमारीने कित्येक झोपेविना काढलेल्या रात्री अचानक आनंददायक बनवल्या आहेत.” असे लिहीत युवराजने हा फोटो शेअर केला आहे.
युवराजने याच पोस्टमध्ये आपल्या चिमुकल्या ऑराचा फोटो सुद्धा शेअर केला आहे. हेझलच्या हातात त्यांचा लहान मुलगा ओरियन तर युवराजच्या हातात चिमुकली ऑरा दिसत आहे. काही मिनिटांपूर्वी शेअर करण्यात आलेल्या पोस्टवर आतापर्यंत लाखाहून अधिक लाईक्स आहेत. तसेच यावर अनेक सेलिब्रिटी व चाहत्यांनी कमेंट्स करून अभिनंदन केले आहे.
युवराज व हेझलच्या या चिमुकलीच्या नावाचा अर्थही खूप खास आहे. ऑरा या शब्दाचा इंग्रजी अर्थ हा वारा, किंवा अगदी नेमका सांगायचं तर वाऱ्याची झुळूक असा आहे.

Yuvraj Singh Hazel Keech Blessed With Baby Girl

Yuvraj Singh and Hazel Keech Announce Birth Of Baby Girl Reveal Her Name;

युवराज सिंगच्या घरी आली चिमुकली परी;
लेकीचा चेहरा दाखवून सांगितलं नाव, अर्थही आहे खास

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm