belgavkar

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : चुलतीचा खून
बेळगाव—belgavkar : अथणी : मोटारसायकल दिली नसल्याच्या रागातून पुतण्याने चुलतीचा (काकू) डोक्यात लोखंडी टॉमी घालून खून केल्याची घटना संबरगी (ता. अथणी) येथे सोमवारी रात्री उशिरा घडली. मंगल तुकाराम सावडकर (वय 60, रा. संबरगी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत अथणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, संशयित संजय राजाराम सावडकर (24, रा. संबरगी) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, संबरगी येथे मंगल सावडकर या मुलगा व सून यांच्यासह राहतात. संजय सावडकर हा एकटाच असल्याने तोही चुलती मंगल यांच्याकडेच राहत होता. गेल्या काही
दिवसांत त्याने वेगळे राहण्याचा विचार करून काही दिवस
घराबाहेर राहिल्याचे कळते. अलीकडेच मंगल यांच्या मुलग्याने
मोटारसायकल घेतली आहे. सोमवारी रात्री संजय याने घरी
येऊन चुलती मंगल यांच्याकडे मला आता मोटारसायकल
पाहिजे, बाहेर जाणार आहे, असे सांगितले. त्यावेळी इतक्या
रात्री कुठे जाऊ नकोस, उद्या सकाळी मोटारसायकल पाहिजे
तर घेऊन जा, असे सांगितले.
यावेळी संतापलेल्या संजयने
दारातच घुटमळणे सुरू केले. त्यावेळी चुलती मंगल घराबाहेर
आल्या असता, त्यांच्या डोक्यात लोखंडी टॉमीने मारून तिला
गंभीर जखमी केले. ही घटना घडताच मंगल यांच्या घरातील
व आजूबाजूचे लोक मदतीसाठी धावले. तत्काळ मंगल यांना
मिरज येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना
मृत घोषित केले. मिरज पोलिसांनी प्रथम घटनेची नोंद घेऊन
याची माहिती अथणी पोलिसांना दिली. त्यानंतर अथणी
पोलिसांनी संबरगी येथे जाऊन संशयित संजय सावडकर
याला ताब्यात घेतले. या प्रकरणात अथणी पोलिसांनी संजय
याच्याशिवाय आणखी एकालाही ताब्यात घेतले आहे.
Belgaum Sambaragi Athani Murder Nephew Killed belgavkar Belgaum belgav belagavi belgaum

isro prepares for chandrayaan 3 ‘sleep mode’ as lunar night nears says somanath 4 hours ago

belgavkar

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm