बेळगाव : सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध

बेळगाव : सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध

belgavkar.com | belgaum | belgavkar

रमाकांत कोंडुसकर यांनी घेतली मुख्यमंत्री शिंदे यांची भेट

आरोग्य योजनांचा लाभ घेण्यासाठी म. ए. समितीचे पत्र आवश्यक

बेळगाव—belgavkar : सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध असून सीमाभागातील मराठी भाषिकांना आवश्यक त्या सुविधा देण्यासाठी विविध योजना हाती घेतल्या जात आहेत, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. मुंबई येथे बुधवारी सीमाप्रश्नी आयोजित केलेल्या तज्ज्ञ समितीच्या बैठकीपूर्वी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी विधानसभा निवडणुकीसह इतर विषयांबाबत माहिती जाणून घेतली. तसेच, सीमाप्रश्न लवकर निकालात निघावा, यासाठी सर्व गोष्टींची पूर्तता केली जात असल्याचे सांगितले. यावेळी खासदार धैर्यशील माने, आनंद आपटेकर, मंगेश चिवटे, शिवराज सावंत, सागर पाटील, विकास कलघटगी आदी उपस्थित होते.
अ‍ॅड. महेश बिर्जे यांचा समितीत समावेश करावा
विविध आंदोलनात सहभागी असणाऱ्या आणि तज्ज्ञ समितीचे सभासद असलेल्या अ‍ॅड. राम आपटे यांच्या निधनानंतर अ‍ॅड. महेश बिर्जे यांचा समितीत समावेश करावा, अशी शिफारस करण्यात आली आहे. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.
माजी केंद्रीय मंत्री शरद पवारांची भेट
1 नोव्हेंबर काळा दिनाच्या फेरीवेळी महाराष्ट्रातून प्रतिनिधी पाठवून देण्याचे आश्वासन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मध्यवर्ती समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे. मध्यवर्ती समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, माजी सनदी अधिकारी दिनेश ओऊळकर, तालुका समितीचे सचिव अ‍ॅड. एम. जी. पाटील, अ‍ॅड. महेश बिर्जे यांनी मुंबई येथे पवार यांची भेट घेऊन चर्चा केली.

belgaum Maharashtra government is committed to solving the border issue belgavkar बेळगाव belgaum

belgaum Ramakant Konduskar met Chief Minister Shinde belgaum

बेळगाव : सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध
रमाकांत कोंडुसकर यांनी घेतली मुख्यमंत्री शिंदे यांची भेट

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm