बेळगाव : लाल-पिवळ्या झेंड्याला सरकारची मान्यता आहे का? पोलिस निरीक्षकांनी कोर्टात दिली महत्त्वपूर्ण साक्ष

बेळगाव : लाल-पिवळ्या झेंड्याला सरकारची मान्यता आहे का?
पोलिस निरीक्षकांनी कोर्टात दिली महत्त्वपूर्ण साक्ष

belgavkar.com | belgaum | belgavkar

महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे 1 नोव्हेबरला काळा दिन. लाल-पिवळा झेंड्यावरून शाब्दिक चकमक

बेळगाव—belgavkar : कर्नाटक (Karnataka) राज्याचा स्वतंत्र झेंडा आहे का? लाल-पिवळ्या झेंड्याला शासनाची मान्यता आहे, गॅझेट किंवा न्यायालयाचा आदेश जारी आहे का? या प्रश्‍नावर शहापूर पोलिस निरीक्षकांनी त्याची आपल्याला माहिती नाही, असे उत्तर न्यायालयात दिले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे 1 नोव्हेबर 2016 मध्ये काळादिन आयोजित केला होता. शहरात सायकल फेरी आयोजित केली होती. शहापूर काकेरू चौकात फेरी पोहोचल्यानंतर लाल-पिवळा झेंड्यावरून शाब्दिक चकमक उडाली. म. ए. समिती नेत्यांवर गुन्हे दाखल केले. दाव्याची सुनावणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी तृतीय न्यायालयात झाली.
यावेळी फिर्यादी व टिळकवाडी पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक लक्कण्णावर यांची साक्ष झाली. निरीक्षकांनी त्याची कल्पना नाही, असे उत्तर दिले. सार्वजनिक ठिकाणी किंवा शासकीय कार्यालयावर राष्ट्रीय ध्वज वगळता अन्य झेंडा लावणे बेकायदेशीर ठरते का? त्याला श्री. लक्कण्णावर यांनी राष्ट्रीय ध्वज वगळता अन्य झेंडा लावणे बेकायदेशीर आहे, असे उत्तर दिले आहे. शहापूर ठाण्यात 2016 मध्ये दाखल फिर्यादीत श्री. लक्कण्णावर यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी काकेरू चौकातील कर्नाटक राज्याचा लाल-पिवळा झेंडा हटविला, अशी फिर्याद दिली आहे. यासाठी कर्नाटकाचा स्वतंत्र झेंडा आहे का आणि लाल पिवळ्याला कर्नाटक किंवा केंद्राकडून मान्यता आहे का? असा प्रश्‍न ॲड. महेश बिर्जे यांनी न्यायालयात उपस्थित केला. म. ए. समितीतर्फे ॲड. महेश बिर्जे, ॲड. प्रताप यादव, ॲड. बाळासाहेब कागणकर, ॲड. वैभव कुट्रे यांनी काम पाहिले.

belgaum Karnataka police Court Indian Flag Shahapur Police Inspector Testified In The Court About Karnataka Red Yellow Flag belgavkar बेळगाव belgaum

Shahapur Police Inspector Testified In The Court About Karnataka Red Yellow Flag belgaum

बेळगाव : लाल-पिवळ्या झेंड्याला सरकारची मान्यता आहे का? पोलिस निरीक्षकांनी कोर्टात दिली महत्त्वपूर्ण साक्ष
महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे 1 नोव्हेबरला काळा दिन. लाल-पिवळा झेंड्यावरून शाब्दिक चकमक

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm