dear-killed-in-joida-taluk-virnoli-dear-mutton-16kg-forest-department-202009.jpg | हरणाची शिकार करून मटणाचा वाटा; तिघांना अटक | belgaum news | belgavkar बेळगावकर

हरणाची शिकार करून मटणाचा वाटा; तिघांना अटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

जोयडा : हरणाची शिकार केल्याची घटना जोयडा तालुक्यातील विर्नोली येथील जनता कॉलनीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी तिघांना वन खात्याने अटक केली असून, त्यांच्याकडून हरणाचे 16 किलो मटण आणि अन्य साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी संदीप (वय 36), परशराम आडाव (27) आणि गोपाळ मेदार (29) यांच्यावर वन्यजीव कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहिनुसार वन विभागाने ही कारवाई केली आहे. हरणाची शिकार करून त्यांनी मटणाचे वाटे घातले होते. या प्रकरणात अन्य काहींचा सहभाग असण्याची शक्यता असून त्यांचा शोध सुरू आहे. उप वनसंरक्षक एस. एस. निंगाणी यांच्या नेतृत्वाखाली वनक्षेत्रपाल बसवराज व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
i