बेळगाव महापालिकेतील फाईल गायब प्रकरण

बेळगाव महापालिकेतील फाईल गायब प्रकरण

belgavkar.com | belgaum | belgavkar

पोलिसांनी चिकटवली महापौरांच्या घरावर नोटीस

बेळगाव—belgavkar : बेळगाव महापालिकेतील फाईल गायब प्रकरण चांगलेच तापले असून मार्केट पोलिसांनी महापौर शोभा सोमणाचे यांच्या घरावर नोटीस चिकटवली आहे. पोलीस स्थानकात हजर राहण्याबाबत या नोटिसीत उल्लेख आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. यानंतर सत्ताधारी नगरसेवकांनी मार्केट पोलीस स्थानकात जाऊन नोटिसीला उत्तर देऊ, असे निवेदन दिले आहे. महापालिकेतील फाईल गायब झाल्यानंतर कौन्सिल सेक्रेटरी उमा बेटगेरी यांनी महापौर शोभा सोमणाचे यांच्या विरोधात मार्केट पोलीस स्थानकात तक्रार दिली. त्यानंतर घडामोडींना वेग आला.
महापालिकेची सर्वसाधारण सभा शनिवार दि. 21 रोजी झाली. त्यामध्ये बेंगळूर येथील नगर प्रशासन संचालनालयाने महापालिकेला नोटीस बजावली होती. त्यानंतर महापालिकेतील राजकारणाला वेगवेगळे वळण लागत आहे. महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी नोटिसीला उत्तर देताना तारखेची नोंद चुकीची केली. त्यानंतर सत्ताधारी भाजप पक्षाने त्यांना लक्ष बनवले. या प्रकारानंतर पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सभागृहात उपस्थित राहून त्यावर चर्चा करण्याची मागणी केली. मात्र, सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी सर्वसाधारण सभा आटोपती घेऊन तेथून काढता पाय घेतला. त्यानंतर फाईलबाबत चौकशी केली असता ती फाईलच गायब झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेनंतर सतीश जारकीहोळी यांनी कौन्सिल सेक्रेटरींना दोषी ठरविले होते.
आयुक्त अशोक दुडगुंटी यांना कौन्सिल सेक्रेटरी विरोधात तक्रार देण्यास सांगितले. त्यानंतर कौन्सिल सेक्रेटरींनी सदर फाईल महापौरांनी नेल्याचे सांगितले. यामुळे पालकमंत्र्यांनी गांभीर्याने दखल घेऊन महापौरांच्या विरोधात तक्रार देण्यास सांगितले. त्यानंतर उमा बेटगेरी यांनी तक्रार दिली. आता महापौर यांनीही तक्रारीस उत्तर दिले आहे. एकूणच या प्रकरणामुळे मोठा गोंधळ उडाला असून साऱ्यांचेच लक्ष याकडे लागले आहे.

belgaum market police pasted a notice on the house of Mayor Shobha Somanache belgavkar बेळगाव belgaum

belgaum Mayor Shobha Somanache belgaum

Mayor Shobha Somanache belgaum

Belgaum Municipal Corporation Mayor

बेळगाव महापालिकेतील फाईल गायब प्रकरण
पोलिसांनी चिकटवली महापौरांच्या घरावर नोटीस

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm