बेळगाव : अखेर महापौरांनी राज्यपालांना निवेदन दिले

बेळगाव : अखेर महापौरांनी राज्यपालांना निवेदन दिले

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याची तक्रार

बेळगाव—belgavkar : राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची भेट घेत महापौर शोभा सोमणाचे यांनी महापालिका आयुक्तांनी सर्वसाधारण बैठकीच्या इतिवृत्तात फेरफार करून शासनाकडे चुकीची माहिती पाठविल्याची तक्रार केली. हे प्रकरण गांभिर्याने घ्यावे व त्यांच्यावर कारवाई केली जावी, अशी मागणीही केली. त्याबाबतचे निवेदनही महापौरांनी राज्यपालांना दिले. यावेळी आमदार अभय पाटील, माजी आमदार अनिल बेनके यांच्यासह सत्ताधारी गटाचे नगरसेवक उपस्थित होते.
यावेळी राज्यपालांना आणखी दोन निवेदने दिली. आयुक्त अशोक दुडगंटी यांच्याविरोधात शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी करणारा विषय सभागृहात मांडणारे सत्ताधारी गटाचे नगरसेवक संदीप जिरग्याळ यांनीही निवेदन दिले. याशिवाय माजी आमदार अनिल बेनके यांनी निवेदन दिले. 16 सप्टेंबरच्या बैठकीच्या इतिवृत्तात फेरफार करणाऱ्या अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी आपण केल्याचे जिरग्याळ यांच्या निवेदनात नमूद आहे. बेनके यांनी दिलेल्या निवेदनात बेळगाव शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याची तक्रार राज्यपालांकडे करण्यात आली आहे. बेळगावातील पोलिस यंत्रणा पालकमंत्री सतीश जारकीहोळी सांगतील, त्याप्रमाणे वागत आहे. त्यामुळेच रमाकांत कोंडूसकर व त्यांच्या समर्थकांकडून नगरसेवकांना भिती घातली जात आहे, अशी तक्रार बेनके यांनी केली आहे. कोंडूसकर यांच्या समर्थकांनी गुरूवारी रात्री नगरसेवक राजू भातकांडे यांच्या घरी जावून हल्ल्याचा प्रयत्न केला. त्या घटनेला 12 तासांपेक्षा जास्त कालावधी लोटला तरी पोलिसांकडून कारवाई झालेली नाही.

belgaum Mayor Shobha Somane meeting Governor Thawarchand Gehlot regarding Municipal Commissioner belgavkar बेळगाव belgaum

belgaum Mayor Shobha Somane vs Governor Thawarchand Gehlot

Municipal Commissioner belgaum

बेळगाव : अखेर महापौरांनी राज्यपालांना निवेदन दिले
बेळगाव शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याची तक्रार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm