बेळगाव : 138 सफाई कामगार नियुक्ती प्रकरण — चौकशीला आम्ही तयार — आमदार अभय पाटील

बेळगाव : 138 सफाई कामगार नियुक्ती प्रकरण — चौकशीला आम्ही तयार — आमदार अभय पाटील

belgavkar.com | belgaum | belgavkar

राजू सेट आमदार नव्हे तर 59 वा नगरसेवक

बेळगाव—belgavkar : महापालिकेत 138 सफाई कामगारांच्या नियुक्तीत भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप आमदार राजू सेट करत आहेत. पण, हा विषय ठेकेदारांचा आहे. सरकारने त्यांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात चौकशीला आम्ही तयार आहोत, अशी माहिती आमदार अभय पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. आमदार पाटील म्हणाले, आम्ही 138 कामगारांच्या चर्चेतून पळ काढला. या प्रकरणात भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप केला जात आहे. पण, सभेच्या अजेंड्यात हा विषयच नव्हता. त्यामुळे पळ काढण्याचा प्रश्नच येत नाही.
138 कामगारांची नियुक्ती करण्याबाबत राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यानुसार ठेकेदारांनी त्यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये महापौर, उपमहापौरांचा संबंधच नाही. पण, अधिकारी चुकीची माहिती देतआहेत. त्यामुळे भ्रष्टाचार झाला असा कांगावा करण्यात येत आहे. आता आमदार सेट यांचेच सरकार असल्यामुळे त्यांनी चौकशी करावी, आम्ही तयार आहोत. पण, लोकांत चुकीची माहिती पसरवण्यात येत आहे. आमदार राजू सेट यांच्या झोपेतही 138 कामगारांचा विषय येत आहे. ते सातत्याने आमच्यावर आरोप करत आहेत. ते आमदार नव्हे तर 59 वा नगरसेवक असल्यासारखे वागत आहेत, असा आरोप आमदार अभय पाटील यांनी केला. तर पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या आरोपांवर मात्र मी काही बोलणार नाही, असे सांगितले.
ठेकेदारांनी नगरसेवकांवर केलेल्या आरोपाबाबत बोलताना आमदार पाटील यांनी, ठेकेदार रोज पत्र देतात, त्यांच्या मागणीला किती महत्त्व द्यायचे, हा वेगळा विषय आहे. कामगारांचे वेतन सरकारने मंजूर केले आहे. त्यामुळे यामध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप चुकीचा आहे, असे सांगितले. महापालिकेत 2023-24 सालच्या घरपट्टीबाबत करण्यात आलेल्या ठरावाची प्रत बंगळूरला पाठवण्यात आली, असे अधिकारी सांगत आहेत. पण, कोणती फाईल गायब झाली आहे, याची माहिती त्यांनी लोकांना द्यावी. आम्ही दलित-मराठा असा वाद करत नाही. पण, अधिकारीच इतर कर्मचाऱ्यांना मनमानी वागणूक देत आहेत. महापौरांविरोधात तक्रार करण्यास भाग पाडत आहेत. महापौरांना त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोपही आमदार पाटील यांनी केला.
यावेळी माजी आमदार अनिल बेनके, माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, अँड. मारूती जिरली, नगरसेवक राजशेखर डोणी, नगरसेवक श्रेयस नाकाडी, रवी धोत्रे, गिरीश धोंगडी, हणमंत कोंगाली, मुरगेंद्रगौडा पाटील आदी उपस्थित होते.

belgaum 138 Scavenger appointment case We are ready for inquiry MLA Abhay Patil belgavkar बेळगाव Belgaum Municipal Corporation

belgaum 138 Scavenger appointment case Belgaum Municipal Corporation

MLA Abhay Patil belgavkar

Belgaum Municipal Corporation belgaum

बेळगाव : 138 सफाई कामगार नियुक्ती प्रकरण — चौकशीला आम्ही तयार — आमदार अभय पाटील
राजू सेट आमदार नव्हे तर 59 वा नगरसेवक

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm