मथुरेच्या फटाकेबाजारात लागली भीषण आग

मथुरेच्या फटाकेबाजारात लागली भीषण आग

belgavkar.com | belgaum | belgavkar

7 दुकाने भस्मसात, फायरमॅनसह 9 जण होरपळले  

उत्तर प्रदेशमधील मथुरा शहरातील गोपालबागमध्ये फटाके बाजारातील काही दुकानांमध्ये रविवारी आग लागल्याने 7 दुकानं जळून भस्मसात झाली. या आगीमध्ये एका फायरमनसह 9 जण होरपळले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
पोलिसांनी सांगितले की, या 7 दुकानांकडे फटाके विकण्याची परवानगी होती. या दरम्यान, महावनचे क्षेत्राधिकारी आलोक सिंह यांनी सांगितले की, ही दुर्घटना राया येथील गोपालबाग येथे असलेल्या एका तात्पुरत्या फटाक्यांच्या बाजारामध्ये घडली. आगीची ही घटना घडली तेव्हा बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. तसेच लोक फटाके खरेदी करण्यामध्ये गुंतले होते. 
सिंह यांनी पुढे सांगितले की, आज एका दुकानामध्ये आग लागली. त्यानंतर ही आग बघता बघता इतर दुकानांमध्ये पसरली. ही घटना घडली तेव्हा इथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. तसेच लोक फटाके खरेदी करण्यामध्ये गुंतले होते. घटनेनंतर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. त्यांनी पुढे सांगितले की, फटाक्यांच्या सात दुकानांचं सर्वाधिक नुकसान झालं.  आपापल्या दुकानातील साहित्य वाचवण्याच्या प्रयत्नात दुकानदार आगीत होरपळून जखमी झाले. घटनास्थळावर उपस्थित असलेले फायरमन चंद्रशेखर यांनी उपलब्ध उपकरणांच्या मदतीने बचाव कार्य सुरू केले. त्यांनी प्रयत्नपूर्वक आग सुमारे सहा दुकानांपर्यंत पोहोचू दिली नाही. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या चार जणांना आग्रा येथील एसएन मेडिकल कॉलेजमध्ये आणि इतरांना जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारांसाठी पाठवण्यात आलं आहे. 

Fierce fire breaks out in Mathura firework market

Massive fire breaks out in Mathura firecracker market several injured

9 critically injured as fire breaks out in makeshift cracker market in Mathura

मथुरेच्या फटाकेबाजारात लागली भीषण आग
7 दुकाने भस्मसात, फायरमॅनसह 9 जण होरपळले  

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm