Union Budget 2025 : केंद्र सरकारने भाडेकरुंना मोठा दिलासा दिला आहे. नव्या अर्थसंकल्पानुसार, आता 6 लाख रुपयांपर्यंत भाड्याने राहणाऱ्या नागरिकांचा टीडीएस (TDS) कापला जाणार नाही. आतापर्यंत याची वार्षिक मर्यादा 2.4 लाख रुपये इतकी होती. सरकारच्या या घोषणेमुळे भाड्याने राहणाऱ्या भाडेकरुंना दिलासा मिळणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
या नव्या निर्णयामुळे भाडेकरु आणि घरमालक दोघांनाही फायदा होणार आहे. TDS मधून सूट मिळवण्यासाठीची वार्षिक मर्यादा 2.4 लाख रुपये इतकी होती. गेल्या काही वर्षांमध्ये घरभाड्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. तेव्हा TDS मधून सूट वाढवण्यात यावी अशी मागणी सुरु होती (annual threshold for deduction of tax at source (TDS) on rent to Rs 6 lakh from the current limit of Rs 2.4 lakh.).
जर एखादी व्यक्ती अशा घरात राहत असेल, ज्याचे वार्षिक भाडे 2.4 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर त्या व्यक्तीला TDS कापून घरमालकाला भाडे द्यावे लागते. आता वार्षिक भाड्यावर सूट मिळाल्याने 6 लाख रुपयांपर्यंत वार्षिक भाडे भरणाऱ्या भाडेकरुला TDS कापण्याची गरज नाही. यामुळे भाडेकरुंना फायदा होणार आहे.
