Yojana will boost productivity in 100 low yield districtscअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या असून आज अर्थमंत्र्यांनी देशातील 1.7 कोटी शेतकऱ्यांना आनंदाची बातमी दिलीय. निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना जाहीर केली आहे. या योजनेत 100 जिल्ह्यांचा सहभाग असणार आहे; जेथे कृषी उत्पादन कमी होते, तेथे ही योजना लागू केली जाईल.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
या योजनेचा फायदा हा थेट 1.7 कोटी शेतकऱ्यांना होणार आहे. नेमकी ही योजना काय आहे, त्याचा फायदा बळीराजाला कसा होणार हे जाणून घेऊ.काय आहे पीएम धन कृषी योजना?केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट 2025-26 मध्ये कृषी क्षेत्रसाठी विषेश योजनंची घोषणा केलीय. पंतप्रधान किसान योजनेनंतर आता देशात पीएम धन-धान्य कृषी योजनेची सुरुवात केलीय. या योजनेत साधारण 1.7 कोटी शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार आहे. पीएम धन-धान्य कृषी योजनेचा उद्देश ग्रामीण भारतात समृद्धी आणणं, शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत करणे आणि कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढवणे असा आहे.
100 जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार योजनाया योजनेत त्या 100 जिल्ह्यांचा समावेश असेल, ज्या जिल्ह्यांमध्ये शेतीतं उत्पन्न कमी होतं, तेथे ही योजना राबवली जाईल. या अंतर्गत शेतकऱ्यांना उत्पन्नवाढी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी दिल्या जातील. याशिवाय शेतकऱ्यांसाठी इतरही अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यापैकी किसान क्रेडिट कार्डची व्याप्ती वाढवण्यात आलीय. त्यानंतर क्रेडिट मर्यादा 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी उच्च दर्जाचे बियाणे दिले जाणार आहे. तसेच शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी खताचा पुरवठा केला जाणार आहे. छोट्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पंप संच यांसारख्या कृषी उपकरणांसाठीही अनुदान दिले जातील. नवीन तंत्रज्ञान आणि कृषी उपकरणांचे प्रशिक्षण दिले जाईल. शेतकऱ्यांना त्यांची शेती सुधारण्यासाठी ज्या काही गोष्टींची कमतरता आहे ती पुरविली जाईल.
