'या' रंगाचे शर्ट घालून गाडी चालवल्यास चलान कन्फर्म @कर्नाटक ऐकून हसाल...!

'या' रंगाचे शर्ट घालून गाडी चालवल्यास चलान कन्फर्म कर्नाटक ऐकून हसाल...!

शर्टच्या रंगामुळे तुम्हाला दंड भरावे लागत असेल तर
Traffic Challan : Wearing dark shirt, driving car

Do not drive wearing shirt or T-shirt of this colour, camera will issue challan

AI cameras in Karnataka fail to spot seatbelt, fine many : Traffic Rules : रस्त्यावर गाडी चालवताना नियमांचे पालन न केल्यास ट्रॅफिक पोलीस तुमचं चलान कापतात. आता तंत्रज्ञानही (Technology) प्रगत झालंय. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक पोलीस नसले तरी नियम तोडणाऱ्यांना दंड हा भरावाच लागतो. तुम्ही निर्धारित वेगापेक्षा जास्त वेगाने गाडी चालवली तर रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेरा फोटो कॅप्चर करतो आणि त्याद्वारे चलान जारी केले जाते. लाल सिग्नल तोडला, वाहन स्टॉप लाईनवर पार्क केले, जास्त वेगाने गाडी चालवली अशावेळी भूर्दंड हा भरावा लागतो.

QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा

Download QR Code

logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
चलान भरणं हा प्रकार कोणालाही आवडत नाही. पण तुम्ही परिधान केलेल्या शर्ट / टीशर्टच्या रंगामुळे तुम्हाला चलान भरावे लागत असेल तर? ऐकायला धक्कादायक वाटतंय ना? पण एका चालकाला यासाठी चलान जारी झालंय. हे तुमच्यासोबत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आजकाल प्रगत तंत्रज्ञान आल्यामुळे वाहतूक पोलिस नसले तरी कॅमेरे वाहन चालकांच्या सर्व हालचाली टिपतात. वाहतूक विभागानेही AI चा वापर करायला सुरुवात केली आहे. जर तुम्ही चूक केली तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. हे सर्व बरोबर आहे. पण कपड्यांच्या रंगामुळे कधी चलन मिळू शकते का? तुम्ही असा विचारही केला नसेल. पण हे प्रत्यक्षात घडलंय. 
logo
Pay Monthly ₹ 10
₹ 10 एक महिना
काळा टी-शर्ट घातल्याने एका चालकाला दंड ठोठावण्यात आला. केशव किस्ले असे या तरुणाचे नाव असून त्याने X या सोशल मीडिया अकाऊंटवर आलेला धक्कादायक अनुभव शेअर केलाय. मी काळ्या रंगाशिवाय काहीही घालत नाही. मी सीटबेल्ट लावला होता पण तरीही मला चलान आले, असे केशव आपल्या पोस्टमध्ये म्हणतो.  आयटी सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेंगळुरूमध्ये (कर्नाटक) ही घटना घडली आहे. केशव किसले हा तरुण व्यवसायाने इंजिनीअर आहे. आपल्या एक्स पोस्टमध्ये त्याने बेंगळुरू ट्रॅफिक पोलिसांना टॅग करत त्यांच्या निदर्शनास ही घटना आणून दिली आहे.   
logo
Pay Weekely ₹ 5
₹ 5 एक आठवडा
गाडी चालवताना मी नेहमीच सीट बेल्ट लावतो, तरीही सीट बेल्ट न लावल्याचे कारण दाखवत मला अलिकडेच एक चलन मिळाले आहे. काळी टी-शर्ट घातलेली व्यक्ती सीट बेल्ट कायद्याचे पालन करत आहे की नाही हे तुमची कॅमेरा सिस्टीम कशी ठरवते? असा प्रश्न त्याने वाहतूक पोलिसांना विचारला. केशवने चलनासोबत त्याच्या गाडीचा फोटोही जोडला आहे. त्याच्या तक्रारीची दखल घेत वाहतूक पोलिसांनी त्याला ईमेलद्वारे तक्रार नोंदवण्यास सांगितले. मला सापडलेल्या नंबरवर कोणीही फोन उचलत नाही, असे केशव म्हणतो. 
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
अशी घटना का घडली?
एका अहवालानुसार, रस्त्यांवर बसवलेले कॅमेरे सीट बेल्ट आणि काळे कपडे यात फरक करू शकत नाहीत. या प्रकरणातही असेच घडले आहे. कारण चलन स्वयंचलित प्रक्रियेद्वारे जारी केले गेले जाते. म्हणजेच जर त्याजागेवर पोलीस उभे असते  तर काहीच अडचण आली नसती. याचा अर्थ कॅमेऱ्यापासून ते त्याच्या AI सिस्टीमपर्यंत सर्वकाही अपडेट करणे आवश्यक आहे. सोशल मीडियावर हे प्रकरण समोर आल्यानंतर आणि पोलिसांना सर्व माहिती मिळाल्यानंतर केशवचे चलन रद्द करण्यात आले. सर्वसामान्य नागरिकांना एखादे चलान आले तर ते चूक कोणाची? वैगेरे विचार न करता तात्काळ भरुन टाकतात. ते पोलीस स्थानकाची पायरी सहसा चढत नाहीत. पण तंत्रज्ञानाच्या अनेक चांगल्या पैलूंमध्ये अशी एखादी त्रुटीदेखील उघड होऊ शकते, ज्यामुळे सर्वसामान्यांना मनस्ताप सहन करावा लागू शकतो, हे या घटनेतून समोर आले आहे.
logo payment
अर्धवट नाही.. वाचा पूर्ण बातमी...!
पूर्ण बातमी वाचण्यासाठी Payment करा
logo top
प्रीमियम मेंबरशिप घेतले असेल तर Login करा
logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
logo
Pay Monthly ₹ 10
₹ 10 एक महिना
logo
Pay Weekely ₹ 5
₹ 5 एक आठवडा
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
प्रीमियम मेंबरशिप घेतले नसेल तर Payment करा आणि पूर्ण बातमी वाचा कोणत्याही अडथळ्याविना
Browser Setting

Traffic Challan : Do not drive wearing shirt or T shirt of this colour camera will issue challan

Wearing dark shirt driving car? AI cameras in Karnataka fail to spot seatbelt

'या' रंगाचे शर्ट घालून गाडी चालवल्यास चलान कन्फर्म @कर्नाटक ऐकून हसाल...!
शर्टच्या रंगामुळे तुम्हाला दंड भरावे लागत असेल तर? Traffic Challan : Wearing dark shirt, driving car?

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm